मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये सिल्वर मेडल पटकावत भारताचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. तर दुसरीकडे हंगेरीमध्ये आयोजित वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने थेट गोल्ड मेडलला गवसणी घातली आहे. भारताची कुस्तीपटू प्रिया मलिक हिने भारतासाठी हे गोल्ड मेडल जिंकलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान या मोठ्या विजयाचं श्रेय प्रियाने तिचे कोच अंशु मलिक यांना दिलं आहे. प्रियाच्या म्हणण्याप्रमाणे, या विजयामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.


हरियाणाच्या जींद जिल्ह्याची प्रिया मलिक निवासी आहे. प्रिया चौधरी भरत सिंह मेमोरियल खेल स्कूल निडानीची विद्यार्थीनी आहे. दरम्यान प्रियाचे वडील जयभगवान निडानी इंडियन आर्मीतून रिटायर आहेत. 


प्रियाने 2020मध्ये नॅशनल स्कूल गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकलं होतं. याशिवाय गेल्या वर्षी पटनामध्ये झालेल्या राष्ट्रीय कॅडेट कुस्ती स्पर्धेतही गोल्ड मेडल पटकावलं होतं. दरम्यान प्रियाचं स्वप्न आहे की ऑलिम्पिकमध्ये तिला भारताचं नेतृत्व करायचं आहे.