`तुझी बहिण असल्याचा गर्व आहे...` Arjun Tendulkarच्या शतकावर बहिणीची Emotional पोस्ट
रणजी ट्रॉफी स्पर्धेत पदार्पणातच Arjun Sachin Tendlkar चं शानदार शतक, सारा तेंडुलकरने लिहिली Emotional पोस्ट
Arjun Tendulkar Centrury : रणजी ट्रॉफी स्पर्धेत (Ranji Trophy) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरने (Arjun Tendulkar) धमाकेदार शतक करत क्रिकेट जगताला आपली दखल घ्यायला भाग पाडलं आहे. राजस्थाविरुद्धच्या सामन्यात गोव्याकडून (Rajasthan vs Goa) खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने 179 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकारांसह आपलं शतक पूर्ण केलं. गोव्याकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणातच (First Class Cricket Debut) शतकी कामगिरी केल्याने अर्जुन तेंडुलकरचं सर्वत्र कौतुकही होतंय.
बहिण साराने लिहिली इमोशनल पोस्ट
अर्जुन तेंडुलकरने शतक केल्यानंतर बहिण सारा तेंडुलकरने (Sara Tendulkar) इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. 34 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याचं तीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सचिन तेंडुलकरन 1988 मध्ये आपला पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला होता. आपल्या पहिल्या सामन्यात सचिनने नाबाद 100 धावांची खेळी केली होती. आता 34 वर्षांनंतर वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अर्जुन तेंडुलकरनेही 120 धावांची खेळी केली.
सारा तेंडुलकरने अर्जुन तेंडुलकरच्या या शतकी खेळीचं कौतुक केलं आहे. यासंदर्भात तीने इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट शेअर केली असून त्यात तीने म्हटलंय, 'तुझ्या मेहनतीचं फळ हळूहळू तुला मिळत आहे, ही तर फक्त सुरुवात आहे, तुझी बहिण असल्याचा मला अभिमान आहे' असं साराने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.
मुंबई संघाला सोडचिठ्ठी
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अर्जुन तेंडुलकरने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (MCA) मुंबई क्रिकेट सोडण्यासाठी अपील केलं होतं. मुंबई संघाकडून खेळण्याची संधी मिळत नसल्याने अर्जुन तेंडुलकरने गोवा संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला. आता रणजी क्रिकेट स्पर्धेतून अर्जुन तेंडुलकरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.
आयपीएलमध्येही खेळण्याची संधी नाही
आपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स (Mumbai Indiance) संघाचा खेळाडू आहे. पण गेल्या दोन हंगामात त्याला एकदाही खेळण्याची संधी मिळालेली नाही. पहिल्या हंगामात अर्जुन तेंडुलकरला 20 लाख रुपये, तर दुसऱ्या हंगामात 30 लाख रुपयांचा करारासह मुंबई इंडियन्स आपल्या संघात घेतलं होतं.