नवी दिल्ली : क्रिकेटर युवराज सिंह याची पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाकडून निराशा झाली आहे. युवराज सिंहने त्याच्या भावा संदर्भात एका याचिका सादर केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यात त्याने म्हटले होते की, त्याचा भाऊ जोरावर सिंह याच्या वैवाहीक विवादावर मीडियामध्ये येत असलेल्या बातम्यांवर बंदी घालण्यात यावी. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं मुद्दा उपस्थित करत युवराजची ही मागणी कोर्टाने फेटाळली आहे.  


युवराजने ही याचिका २०१५ मध्ये दाखल केली होती. मात्र कोर्टाने नोटीस जारी केली नव्हती. आतापर्यंत यावर १९ सुनावण्या झाल्या. युवराज सिंह, त्याची आई शबनम सिंह आणि जोरावर सिंह यांनी कोर्टात याचिका सादर करत मीडिया त्यांच्या कौटुंबिक प्रकरणात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच या प्रकरणातील वृत्तांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. 


आरोप होता की, जोरावरची पत्नी ही युवराजच्या परिवाराची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. यावर कोर्टाने म्हटले होते की, मीडियात प्रकरणात संयमाने काम करत नसल्याचा एकही पुरावा याचिकाकर्त्यांनी दिला नाही. संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचं आणि लिहिण्याचं स्वातंत्र्य दिलंय. मीडियातील वृत्तांवर बंदी घातली जाऊ शकत नाही. 


युवराजच्या आईला ३५ लाखांचां दंड


युवराज सिंह आणि त्याचा परिवार गेल्या दोन वर्षांपासून कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये युवराज सिंहची आई शबनम सिंहच्या घराचं गेट पडल्याने ८ वर्षाच्या मुलाचा जीव गेला होता. तर दुस-या एका प्रकरणात त्याच्या आईवर ३५ लाखांचां दंड ठोठावण्यात आला होता.