IPL 2025: पंजाब किंग्सचं स्वप्न भंगलं, दिग्गज खेळाडूला नाही बनवू शकले कोच, LSG साठी आनंदाची बातमी
पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सला नव्या कोचची प्रतीक्षा आहे. लखनऊ सुपर जाएंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला मेंटॉर पाहिजे, अशात फ्रेंचायझी अनेक माजी खेळाडूंशी बोलणी करत आहेत.
आयपीएल 2025 च्या तयारीला आत जोरदार सुरुवात झाली आहे. काहीच महिन्यांमध्ये बीसीसीआय खेळाडूंच्या रिटेंशन संदर्भात नियम जाहीर करेल. यानंतर 2024 च्या अंती आयपीएल 2025 साठी ऑक्शन पार पडेल. ऑक्शनपूर्वी आयपीएल फ्रेंचायझी टीमच्या कोच आणि मेंटॉर निवडण्याबाबत वेगाने निर्णय घेऊ लागली आहे. पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सला नव्या कोचची प्रतीक्षा आहे. लखनऊ सुपर जाएंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्सला मेंटॉर पाहिजे, अशात फ्रेंचायझी अनेक माजी खेळाडूंशी बोलणी करत आहेत.
पंजाब किंग्सच्या आशेवर पाणी :
पंजाब किंग्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. पंजाब फ्रेंचायझीला भारताचा एक महान फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणला आपलं कोच बनवायचं होतं. परंतु लक्ष्मणने टीम सोबत जुडण्यास नकार दिला. त्याने बीसीसीआयच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीचा प्रमुख म्हणून आपला कार्यकाळ वाढवला आहे. पंजाबचे कोच ट्रेवर बेलिसचा कार्यकाळ या सीजननंतर संपणार आहे. फ्रेंचायझीने त्याचा कॉन्ट्रेक्ट वाढवलेला नाही.
हेही वाचा : 'या तिघांमुळे T20 WC जिंकलो', रोहित शर्माने मानले आभार; विशेष म्हणजे यात बुमराह, कोहली, पांड्या नाही
लखनऊ सोबत जोडला जाऊ शकतो जहीर खान :
भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खान आयपीएलच्या पुढील सीजनसाठी लखनऊ सुपर जाएंट्स संघासोबत मेंटॉर म्हणून जोडला जाऊ शकतो. जहीर खान यापूर्वी आयपीएल सुद्धा खेळलेला आहे. 45 वर्षीय जहीर खान हा पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये ग्लोबल डेवलमेंटचा प्रमुख होता. त्यांनी याच फ्रेंचायझीमध्ये 2018 ते 2022 पर्यंत डायरेक्टर पद सांभाळले. आयपीएलचे सुरुवातीचे 10 सीजन जहीर खान खेळाडू म्हणून खेळला. यादरम्यान त्याने मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली डेयरडेविल्स या संघांकडून एकूण 100 सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने 102 विकेट्स सुद्धा घेतले.
ईएसपीएन क्रिकइंफोच्या रिपोर्टनुसार, "जहीर खानची लखनऊ सुपर जाएंट्स सोबत मेंटॉर पदाबाबत बोलणी सुरु आहे. गौतम गंभीर हा लखनऊचा मेंटॉर होता. मात्र आता त्याने टीम इंडियाच्या हेड कोचची सूत्र हाती घेतल्यामुळे लखनऊला त्यांच्या टीमसाठी नवा मेंटॉर शोधायचा आहे. त्यामुळे लखनऊ फ्रेंचायझी आता आयपीएल फॉरमॅट आणि टी 20 क्रिकेटची समज असणाऱ्या भारतीय खेळाडूला त्यांचा मेंटॉर बनवून कोचिंग स्टाफ सोबतही जोडू इच्छिते. गंभीर मेंटॉर असताना लखनऊ सुपर जाएंट्स 2022 आणि 2023 ला आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहोचली होती.