दुबई : युएईमध्ये आयपीएलचा दुसरा टप्पा सध्या सुरु आहे. दरम्यान या स्पर्धेमध्ये पंजाब किंग्जसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. पंजाब किंग्जचा धडाकेबाज फलंदाज मध्यावर स्पर्धा सोडून गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाब किंग्ज संघाचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने अचानक आयपीएलमधून माघार घेतली आहे. ख्रिस गेलचा हा निर्णय ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. विशेषतः गेलच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आयपीएल आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतंय. काही दिवसांनी आयपीएलचे प्लेऑफ सामने खेळले जाणार आहेत. 


गेलने का घेतली आयपीएलमधून माघार


सतत बायो बबलमध्ये असल्यामुळे क्रिस गेलने हा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्सने याबाबत ट्वीट केलंय, "पंजाब किंग्ज टीम मॅनेजमेंटने गेलच्या आयपीएलमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाचं स्वागत केलंय आणि त्याला त्याच्या पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या." 


आयपीएल 2021च्या पहिल्या टप्प्यापासून ख्रिस गेल सतत क्रिकेट खेळत आहे, आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्सच्या मते, त्याने हा निर्णय या महिन्यात सुरू होणाऱ्या टी -20 विश्वचषकाबाबत घेतला आहे.


आयपीएल 2021 मध्ये गेलचा प्रवास


आयपीएलचा हा हंगाम ख्रिस गेलसाठी काही खास राहिला नाही. ख्रिस गेलने या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसाठी 10 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 125.32 च्या सरासरीने फक्त 193 धावा केल्या आहेत. गेल या आयपीएलमध्ये एकही अर्धशतक तो झळकावू शकलेला नाही. यापूर्वी ख्रिस गेल सीपीएलमध्ये खेळला होता, ज्यामध्ये त्याने चांगली फलंदाजी केली होती.


गेलच्या अनुपस्थितीचा पंजाबला फटका?


ख्रिस गेलच्या अनुपस्थितीमुळे पंजाब किंग्जच्या संघाला खूप अडचणी येऊ शकतात. आयपीएलचा हा हंगाम पंजाब किंग्जसाठी फारसा चांगला नाही. अशा परिस्थितीत पंजाब किंग्जचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा बाहेर पडणं संघासाठी धोकादायक ठरू शकतं.