Rohit Sharma: अरे त्या खड्ड्यात बॉल टाक...! अखेर जडेजाच्या कामी आली रोहित शर्माची चाणक्य नीती
Rohit Sharma: रोहित शर्माच्या ( Rohit sharma ) उत्तम कॅप्टन्सीमुळे भारताला सामना जिंकण्यास मदत झाली. या सामन्यात रोहित शर्माच्या चाणक्य नितीमुळे रवींद्र जडेजाला ( Ravindra Jadeja ) विकेट मिळाली.
Rohit Sharma: इंग्लंडच्या टीमचा पराभव करत टीम इंडियाने ( Team India ) सेमीफायनलच्या दिशेने अजून एक पाऊल पुढे टाकलं आहे. रविवारी झालेल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 रन्सने पराभव केला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि रोहित शर्मा ( Rohit sharma ) हे विजयाने खरे शिल्पकार ठरले. रोहित शर्माच्या ( Rohit sharma ) उत्तम कॅप्टन्सीमुळे भारताला सामना जिंकण्यास मदत झाली. या सामन्यात रोहित शर्माच्या चाणक्य नितीमुळे रवींद्र जडेजाला ( Ravindra Jadeja ) विकेट मिळाली.
सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोघांनी त्यांच्या गोलंदाजीच्या जोरावर टीमला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर भारतीय स्पिनर्सने देखील चांगली गोलंदाजी केली .कुलदीप यादवने 16व्या ओव्हर्समध्ये इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला क्लीन बोल्ड केलं. दुसरीकडे रवींद्र जडेजा सतत गोलंदाजी करत होता पण त्याला विकेट मिळत नव्हती. अशा परिस्थितीत रोहित ( Rohit sharma ) जडेजा ( Ravindra Jadeja ) च्या मदतीसाठी पुढे आला आणि त्याला विकेट मिळवून दिली.
अशी कामी आली रोहित शर्माची चाणाक्य नीती
इंग्लंडची टीम फलंदाजी करत असताना कर्णधार रोहित शर्माला ( Rohit sharma )खेळपट्टीवर खड्डा तयार होताना दिसला. या खड्ड्याच्या मदतीने जडेजाला ( Ravindra Jadeja ) चांगला टर्न मिळणं अपेक्षित होतं. पण तो त्या ठिकाणी गोलंदाजी करत नव्हता. यावेळी स्टार स्पोर्ट्सने ब्रेकच्या वेळी स्टंप माईकवर रोहितने जडेजाला दिलेल्या सल्ल्याचा व्हिडीओ दाखवला. यामध्ये रोहित ( Rohit sharma ) जडेजाला ( Ravindra Jadeja ) , त्या खड्ड्याच्या मदतीने गोलंदाजी कर ( खड्ड्यात बॉल टाक ), असं म्हणताना दिसतोय.
यावेळी जडेजाने ( Ravindra Jadeja ) रोहितचं म्हणणं ऐकलं आणि त्याचा फायदा त्याला मिळाला. 29व्या ओव्हरमध्ये ख्रिस वोक्स थोडासा बाहेर जाऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होता. यावेली बॉल टर्न झाला विकेटकीपर केएल राहुलच्या ग्लोव्हजमध्ये गेला. अशा परिस्थितीत क्षणाचाही विलंब न करता राहुलने त्याला स्टंप केलं. एकंदरीत रोहितची ( Rohit sharma ) ही चाल टीम इंडियाच्या चांगलीच कामी आलेली दिसून आली.
इंग्लंडचा दारूण पराभव
जॉस बटलरने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी रोहित ( Rohit sharma ) सेनेने 229 रन्सचं टार्गेट दिलं. 230 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या टीमने अवघ्या 39 रन्समध्ये चार विकेट गमावल्या. इंग्लंडचे फलंदाज या सामन्यात पूर्णपणे फेल घेले. जो रूट आणि बेन स्टोक्स यांना भोपळाही फोडता आला नाही. जॉनी बेअरस्टोने 14 आणि डेव्हिड मलानने 16 रन्स केले. मात्र मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी इंग्लंडच्या फलंदाजांना नाकीनऊ आणले. अखेर 129 रन्सवर इंग्लंड ऑलआऊट झाली.