मुंबई : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला अजून एकंट पदक पटकावता आलं आहे. तर आता भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूकडून पदक मिळवण्याच्या भारतीयांच्या आशा वाढल्या आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूने आगेकूच करत क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. सिंधूने डेनमार्कच्या मिया ब्लिचफेल्डचा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवघ्या 40 मिनिटांच्या सामन्यांत 21-15, 21-13 अशा फरकारने सिंधूने सामना जिंकलाय. या विजयामुळे सिंधू केवळ पदकापासून दोनंच पाऊलं लांब आहे. मिया ब्लिकफेल्ड आणि सिंधू यांच्यामध्ये आतापर्यंत सहा सामने झाले असून त्यापैकी पाच सामने सिंधून जिंकले आहेत. 


सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली होती. त्यानंतर कालही दुसऱ्या सामन्यात तिने विजय मिळवला होता. तर आज सिंधूची घौडदौड सुरुच असून तिने आता थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सिंधूचा हा टोकियो ऑलिम्पिकमधील सलग तिसरा विजय आहे. 


सिंधूने या सामन्यामध्ये मियाच्या विरुद्ध खेळताना चांगली सुरवात करत स्कोअर 11-6 असा होता. त्यानंतर मियाने कमबॅक करत स्कोर 16-15 वर आणला. मात्र सिंधूनेही मागे न हटता सेट आपल्या नावे करून घेतला. तर दुसऱ्या सेटमध्ये हाफ टाइमपर्यंत सिंधूने 11-6 च्या फरकाने आघाडी घेतली होती. शेवटी तिने 21-13 च्या फरकाने दुसरा सेटही जिंकला.


तर ग्रुप स्टेजच्या पहिल्या सामन्यातही तिने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा पराभव केला होता. पी व्ही सिंधूने पोलिकार्पोवाचा 21-7 आणि 21-10 अशा फरकाने पराभव केला होता. अवघ्या 29 मिनिटांमध्ये सिंधूने पहिला टोकियो ऑलिम्पिकचा पहिला सामना आपल्या नावावर केला होता.