मुंबई : भारतीय बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधु आणि के. श्रीकांत दुबई सुपर सीरिज फायनल्समध्ये आपला सर्वोत्तम खेळ करण्यास सज्ज आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2017 चा बॅडमिंटन सीझन दोन्ही बॅडमिंटनपटूंसाठी अतिशय चांगला होता. आता 2017 मधील बॅडमिंटन सीझनच्या अखेरच्या टुर्नामेंटमध्ये दोन्ही बॅडमिंटनपटूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. 


श्रीकांतनं या सीझनमध्ये इंडोनेशिया ओपन, ऑस्ट्रेलिया ओपन, डेन्मार्क ओपन आणि फ्रेंच ओपनवर आपलं नाव कोरलंय. तर सिंधूनं इंडिया ओपन, कोरिया ओपन त्याचप्रमाणे तिनं ग्लास्गो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिल्व्हर मेडलही जिंकलं होतं. 


श्रीकांत आणि सिंधूला या टुर्नामेंटमध्ये सोपे ड्रॉ मिळालेत. त्यामुळे सीझनच्या अखेरच्या टुर्नामेंटचा शेवट गोड करण्यास हे दोन्ही बॅडमिंटनपटू आतूर असतील.