`कॉमनवेल्थ`च्या इतिहासात पहिल्यांदाच बॅडमिंटनपटू बनणार ध्वजवाहक
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनस्टार पी. व्ही. सिंधूकडे भारतीय पथकच्या ध्वजवाहकाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनस्टार पी. व्ही. सिंधूकडे भारतीय पथकच्या ध्वजवाहकाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.
गेल्या तीन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पहिल्यांदाच एखाद्या बॅडमिंटनपटूला ध्वजवाहकाचा मान मिळणार आहे. २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूनं भारताला रौप्य पदकाची कमाई करुन दिली होती. तर २०१४ मध्ये ग्लास्गोत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सिंधूला कांस्य पदकावर समाधान मानाव लागलं होतं.
आता सिंधू या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आपल्या पदकाचा रंग बदलण्यात यशस्वी होते का? ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.