नवी दिल्ली: भारतीय कुस्तीपटू आणि दुहेरी ऑलिम्पीक विजेता सुशील कुमार याच्यासाठी कुस्तीचा आखाडा आता धुसरच होताना दिसत आहे. त्याच्या चाहत्यांसाठी काहीशी नकारात्मक बातमी आहे. गुडघ्यातल्या दुखापतीमुळे सुशीलने कुस्तीच्या आखाड्यात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सुशील प्रो रेसलिंग लीगच्या दोन्ही सत्रांमध्ये खेळू शकला नव्हता. तसेच, याही वेळी तो पदार्पण करणार नाही.


चाहत्यांची निराशा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रतिस्पर्धी प्रवीण राणा याच्यासोबत घडलेल्या वाद-प्रतिवादामुळे सुशीलच्या चाहत्यांना त्याला कुस्तीच्या आखाड्यात पाहण्याची मनस्वी इच्छा होती. मात्र, गुडघ्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तो चाहत्यांना आता खाड्यात दिसणार नाही. दिल्लीची टीम आपले चारही सामने हारल्यामुळे सेमीफाइनलच्या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. 


सुशीलने स्वत:च घेतला निर्णय


दरम्यान, ऑलिम्पीक विजेता पैलवान सुशील कुमारने गुडघ्याच्या दुखापतीमुळे आपण खेळू शकणार नसल्याची माहिती दिली आणि चाहत्यांची निराशा झाली. सुशीलला झालेली ही जखम २९ डिसेंबरला झालेल्या राष्ट्रीय मंडळाच्या खेळादरम्यान घेण्यात आलेल्या फायनल ट्रायल वेळी झाली होती. पैलवान जितेंदरसोबत लढताना ही दुखापत सुशीलला झाली होती. सुशीलने म्हटले आह की, स्पर्धेपर्यंत मला वाटत नाही जखम बरी होईल. आणि जखम पूर्ण बरी झाल्याशिवाय खेळणे मला योग्य वाटत नाही. कारण त्याचा कामगिरीवर परिणाम होतोच. पण, जखम सुद्धा वाढते. पुढे ती लवकर भरून येत नाही.


महागात पडू शकते दुखापत


दरम्यान, सुशीलला ही दुखापत महागात पडू शकते. कारण, ही दुखापत कायम राहिल्यास त्याला किर्गिस्तान येथे २४ फेब्रुवारी ते ८ मार्च या काळात होणाऱ्या कुस्ती स्पर्धेतही सहभागी होता येणार नाही. दरम्यान, सुशील सध्या अशियायी स्पर्धेत भाग घेण्यासाठी उत्सुक आहे.