बर्मिंघम: इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या टेस्ट सिरीजमध्ये भारताला पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात 31 रनने पराभव झाल्यानंतर आता विराटच्या टीम सिलेक्शनवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या सामन्यात विराट सोडून कोणताही बॅट्समन चांगली कामगिरी नाही करु शकला.


कोहलीचं शतक व्यर्थ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली याने पराभवानंतर म्हटलं की, 'टीमला त्यांच्या खेळामध्ये सुधारणा आणल्या पाहिजे. आपली रणनीती योग्य प्रकारे लागू करता आली पाहिजे.' इंग्लंडने आपल्या 1000 व्या टेस्टमध्ये चौथ्या दिवशी भारताला पराभवाचा धक्का देत सिरीजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. कोहलीने पहिली इनिंगमध्ये 225 बॉलमध्ये 22 फोर आणि 1 सिक्ससह 149 रन केले. दुसऱ्या इनिंगमध्ये 93 बॉलमध्ये 51 रनची खेळी त्याने केली. पण त्याला कोणीच व्यवस्थित साथ न दिल्याने त्याची ही खेळी व्यर्थ ठरली. 


विराटच्या टीम सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह


विराटने पुजाराच्या जागी शिखर धवनला टीममध्ये घेतल्याने त्याच्यावर टीका होत आहे. शिखरने पहिल्या इनिंगमध्ये 26 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 13 रन केले. याशिवाय त्याने सॅम कुरैनचा कॅच देखील सोडला. ज्यामुळे भारतीय टीमच्या हातातून सामना निघून गेला. पुजाराला बाहेर ठेवून केएल राहुल संघात स्थान दिलं पण त्याने देखील निराश केलं. विराटच्या या दोन्ही सिलेक्शनवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.