Rachin Ravindra In IPL 2024 : सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) धुमाकूळ घालणारा न्यूझीलंडचा स्टार ऑलराऊडर रचिन रविंद्र  (Rachin Ravindra)  गेल्या दीड महिन्यापासून चांगलाच चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. कोणालाही अपेक्षा नसताना रचिनने किंवींना संकटमुक्त केलं. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे न्यूझीलंडचा 23 वर्षीय रचिन रवींद्र ऑक्टोबर महिन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. त्यामुळे आता यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) रचिन कोणत्या संघाकडून खेळणार? असा सवाल विचारला जात आहे. वर्ल्ड कपप्रमाणे रचिन आयपीएलमध्ये देखील धुमाकूळ घालेल, यात काही शंकाच नाही. त्यावर आता रचिनने उत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय मैदानात डावखुऱ्या ऑलराऊंडर्सला मोठं महत्त्व असतं. त्यामुळे जडेजाप्रमाणे रचिनला मोठी बोली लागणार यात शंका नाही. रचिनला आपल्या फ्राँचायझीमध्ये खेचण्याचा प्रयत्न यंदा सर्व संघ करतील, अशी शक्यता आहे. अशातच आता श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात देखील 42 धावांची झुंजार खेळी केलेल्या  रचिन रविंद्रने आपली फेव्हरेट आयपीएल टीम कोणती याबाबत नुकतीच हिंट दिलीये.


काय म्हणतो Rachin Ravindra ?


मला स्टेडियममधील उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी चांगला पाठिंबा दिलाय. पाठिंबा दिल्याबद्दल मी चिन्नास्वामी स्टेडियमचे आणि तेथील प्रेक्षकांचे आभार मानतो. त्यांनी माझ्या मनात एक खास जागा तयार केली आहे. मी इथं अजून क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक आहे, असं म्हणत रचिनने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) खेळण्याचे संकेत दिले आहेत. त्याआधी देखील त्याने विराट कोहलीचं (Virat Kohli) कौतूक करत त्याच्यासोबत खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. 


आणखी वाचा - Babar Azam: होय, आम्ही अनेक चुका...; वर्ल्डकपचा प्रवास संपल्यानंतर बाबरने मान्य केली चूक


दरम्यान, सर्वांना प्रतिक्षा असलेला आयपीएल 2024 चा लिलाव (IPL 2024 Auction) हा 19 डिसेंबरला होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदात लिलाव हा विदेशात म्हणजे दुबईत होत असल्याने सर्वांची प्रतिक्षा शिगेला पोहोचलीये. यंदाच्या आयपीएलमधून फ्राँचायझी कोणत्या खेळाडूंना रिलीझ करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.