जकार्ता : आशियाई स्पर्धा 2018 मध्ये भारतीय नेमबाज राही सरनोबतने जबरदस्त कामगिरी करत चौथ्य़ा दिवशी भारताकडून सुवर्ण पदक जिंकलं आहे. 25 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत कोल्हापूरच्या राहीला सुवर्ण पदक मिळालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशियाई स्पर्धा 2018 मध्ये भारताचं हे 11 वं मेडल आहे. सीरीजमध्ये राहीचे तिन्ही नेम चुकले पण दबावामध्ये फायनलमध्ये थायलंडच्या नेमबाजाचे देखील सर्व नेम चुकले. यानंतर शूटऑफने निर्णय झाला. या दोघांमध्ये झालेल्या फायनलमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली. शेवटपर्यंत कळत नव्हतं की सुवर्णपदक कोण जिंकणार.


सुवर्ण पदकसाठीची प्रबळ दावेदार असलेली मनु भाकर आपल्या खराब कामगिरीमुळे लवकरच स्पर्धेतून बाहेर झाली.