नवी दिल्ली : कॅरेबियन प्रिमियर लीग म्हणजेच CPL 20 मध्ये क्रिकेटर्स नव-नवे रेकॉर्ड्स आपल्या नावावर करत आहेत. या रेकॉर्ड्स दरम्यान वेस्ट इंडिजच्या एका प्लेयरची चर्चा सध्या जोरात होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्लेयरचं नाव आहे रहकीम कॉर्नवाल. २४ वर्षांचा कॉर्नवाल हा एक तंदुरुस्त प्लेयर आहे. शरीर सुदृढ आणि वजनदार असतानाही कॉर्नवाल हा आपल्या खेळात कमी पडत नाही.


२४ वर्षांच्या कॉर्नवाल याचं वजन १४० किलो आहे आणि त्याची उंची ६ फूट ५ इंच आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वांची मनं जिंकणा-या कॉर्नवाल याने सीपीएल २० मध्ये धडाकेबाज बॅटींगचं प्रदर्शन घडवलं.



कॉर्नवालने ४४ बॉल्समध्ये ७८ रन्सची जबरदस्त इनिंग खेळली. १६व्या ओव्हरमध्ये पोलार्डच्या बॉलिंगवर कॉर्नवाल जखमी झाला. मात्र, त्याने आपल्या इनिंगमध्ये ७ फोर आणि ६ सिक्सर लगावले.