ढगांवर तरंगणारा जगातला सर्वात उंच रेल्वे पूल! भारतीय इंजिनियर्सची कमाल, पॅरीसचा आयफेल टॉवरही याच्यापुढे खुजा ठरेल
काश्मीरच्या अत्यंत दुर्गम भागात अशक्य बांधकामं करण्यात आले आहे. यात भर पडलेय ती एका अतिविशाल रेल्वे पुलाची. हा पूल नेमका कुठे आहे, कसा आहे, पाहूयात फोटो स्टोरी...
Chenab Railway Bridge : कुणी म्हणतं हे आश्चर्य आहे... कुणी म्हणतं हे अद्भूत आहे... कुणी म्हणतं अविश्वनीय आहे... कुणासाठी हे स्वप्नवत आहे.. तर कुणासाठी शेकडो किलोमीटरचा वळसा वाचवणारं आहे आणि अमाप संधी उघडणारा राजमार्ग आहे... यातून सगळ्या जगाला भारतीय इंजिनियर्सची अजोड बुद्धिमत्ता दिसलीये. भुगोल आणि विज्ञानाची सगळी सर्व आव्हानं झेलत हा अतिविशाल पूल उभारला जातोय... पॅरीसचा आयफेल टॉवरही त्याच्यापुढे खुजा ठरेल.