टीम इंडियात शिखर धवन खेळणार की नाही? कोच राहुल द्रविडने दिलं उत्तर
कोहलीने डावललं आता रोहित शर्मा-द्रविडही पाठ फिरवणार? शिखर धवनला बाहेर बसवणं ही चूक तर नाही?
मुंबई : शिखर धवन गेल्या काही महिन्यांपासून टीम इंडियात टी 20 फॉरमॅटमध्ये खेळताना दिसला नाही. सतत्याने त्याला डावललं जात असल्याचं दिसत आहे. शिखर धवनने आयपीएलमध्ये देखील चांगली कामगिरी करून त्याला इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात संधी देण्यात आली नाही.
टी 20 वर्ल्ड कपसाठी एक उत्कृष्ट टीम निवडण्यासाठी टीममध्ये वेगवेगळे बदल सातत्याने केले जात आहे. मात्र यामध्ये शिखर धवनला खेळण्याची संधी अजूनही देण्यात आली नाही. शिखर धवन आणि रोहित शर्माची ओपनिंगची जोडी हिट राहिली आहे. असं असतानाही शिखर धवनला बाहेर ठेवण्यात आलं आहे.
शिखर धवनचं करिअर बाहेर बसून हळूहळू धोक्यात येत आहे. तो टी 20 फॉरमॅटमध्ये खेळणार की नाही याबाबत आता टीम इंडियाचे कोच राहुल द्रविडने संकेत दिले आहेत. या संकेतांमुळे क्रिक्रेकटप्रेमी मात्र काहीसे नाराज असल्याचं दिसत आहे.
गब्बरचं करिअर संपुष्टात?
टीम इंडियाचा ओपनर शिखर धवनची टी-20 कारकीर्द आता संपुष्टात येत आहे. केएल राहुल आणि ईशान किशन यांच्यानंतर रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी ऋषभ पंतकडे टी-20 फॉरमॅटच्या ओपनिंगची जबाबदारी सोपवल्याचे संकेत मिळाले आहेत.
शिखर धवन बराच काळ टी-20 टीममध्ये परतलेला नाही. अशा स्थितीत रोहित आणि कोच राहुल द्रविडची एकूण योजना पाहता धवनला पुन्हा खेळण्याची संधी दिली जाणार नाही असंच दिसत आहे.
एक काळ असा होता जेव्हा 35 वर्षीय शिखर धवन टीम इंडियाचा मोठा मॅचविनर मानला जात होता. व्हाईट बॉलच्या क्रिकेटमध्ये धवन रोहितसोबत धावांचा डोंगर रचायचा. आता निवड समिती आणि मॅनेजमेंट शिखरला संधी देत नाही. त्यामुळे यंदाही टी 20 वर्ल्ड कपमध्ये शिखर धवन खेळताना दिसणार नाही असा कयास आहे.
त्याने टीम इंडियासाठी 34 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 2315 धावा तर 149 वन डे सामन्यांत 6284 धावा आणि 68 टी-20 सामन्यांमध्ये 1759 धावा केल्या आहेत.
गेल्या चार वर्षांपासून तो कसोटी टीम बाहेर आहे. त्याचे रूप येत राहिले. नुकतीच वेस्ट इंडिज मालिकेसाठी धवनची टीम इंडियाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. वन डे टीममध्ये धवनला संधी मिळत राहतील, अशी आशा आहे.