मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविडची (Rahul Dravid) टीम इंडियाच्या (Team India) मुख्य प्रशिक्षकपदी (Head Coach) नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेट सल्लागार समितीने राहुल द्रविडची मुख्य प्रशिक्षकपदी एकमताने निवड केली. T20 विश्वचषकानंतर (ICC T20 World Cup) राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारणार आहे. (Rahul Dravid officially appointed head coach of the Team India)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

T-20 विश्वचषकानंतर रवी शास्त्रीचा (Ravi Shastri) कार्यकाळ संपणार असून आता द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया खेळेल. राहुल द्रविड भारत-न्यूझीलंड मालिकेपासून प्रशिक्षकपदाची सुरुवात करणार आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर राहुल द्रविडने प्रतिक्रिया दिली आहे. हे पद मिळणे हा माझ्यासाठी सन्मान आहे आणि या भूमिकेसाठी आपण तयार आहोत, असं राहुल द्रविडने म्हटलं आहे.


रवी शास्त्रीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चांगली कामगिरी केली आणि मला अशा आहे की संघाला पुढे घेऊन जाईन. पुढील दोन वर्षात अनेक मोठ्या स्पर्धा येत आहेत आणि तिथे चांगली कामगिरी करण्याचे आमचं ध्येय आहे, असा विश्वास राहुल द्रविडने व्यक्त केला आहे.