मेलर्बन : अखेर गेल्या वर्षीच्या वर्ल्डकपमधील पाकिस्तानने केलेल्या पराभवाचा वचपा टीम इंडियाने काढला. अखेर आजच्या विजयाचा शिल्पकार विराट कोहली ठरलाय. दरम्यान या सामन्यानंतर विराटने भारतीय फॅन्सची आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची मनं जिंकली आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या T20 वर्ल्डकपमध्ये किंग कोहलीने नाबाद 82 रन्सची खेळी केली. या सामन्यानंतर विराट आणि राहुल द्रविड यांचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहली पाकिस्तानविरूद्धचा सामना जिंकण्यासाठी शेवटपर्यंत टिकून राहिला होता. सामन्यामध्ये एक पॉईंट असा होता जिथे टीम इंडियाचा पराभव निश्चित होता. मात्र विराटने 154.72 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 6 चौकार आणि 4 सिक्स मारले.


टीम इंडियाच्या या विजयानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडची यांचा फोटो व्हायरल झालाय. या फोटोमध्ये राहुल द्रविडने विराट कोहलीला लहान मुलाप्रमाणे मिठी मारली. द्रविडनेही विराट कोहलीला छातीला घट्ट धरून ठेवलं होतं. चाहत्यांसाठी आणि टीम इंडियाच्या इतर लोकांसाठी हा खूप भावनिक क्षण होता.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ICC (@icc)


टीम इंडियाला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 1 रनची गरज होती. आर अश्विनने सिंगल घेताच संपूर्ण भारतात जल्लोषाचे वातावरण निर्माण झालं. इतकंच नाही तर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा डगआऊटमधून धावत आला आणि विराट कोहलीला उचलून घेतलं. दोघांच्याही चाहत्यांसाठी हा फार आनंदाचा क्षण होता.


टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. रविचंद्रन अश्विनने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने गेल्यावर्षीच्या वर्ल्डकपमधील पराभवाचा वचपा काढलाय.


टी20 वर्ल्डकप 2022 मधील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या विरोधात विराटने सर्वोत्तम खेळी करत पाकिस्ताच्या तोंडातला विजय हिसकावून आणला. पराभवाच्या वाटेवर असलेल्य़ा टीम इंडियासाठी विराट कोहलीने विजय खेचून आणला. त्याच्या या कामगिरीनंतर संपूर्ण जगातून त्याचं कौतूक होतंय. भारतच नाही तर क्रिकेट विश्वातील प्रत्येक व्यक्तीला विराटच्या या खेळीचं कौतूक वाटतंय.