मुंबई : 19 वर्षाखालील विश्वचषकावर भारताच्या युवा संघानं आपलं नाव कोरलं.


द वॉल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाचं मार्गदर्शनं मिळालं ते द व़ॉल अर्थात राहुल द्रविडचं. भारताला हे जगज्जेतेपद मिळवून देण्यात याच अनसंग हिरोनं मोलाची भूमिका बजावली आहे. राहुल द्रविड....  अर्थातच भारतीय क्रिकेटची अभेद्य भिंत अशीच त्याची क्रिकेटजगतामध्ये खरी ओळख आहे. मात्र, क्रिकेटला अलविदा केल्यानंतर भारताच्या या लिजेंडरी क्रिकेटपटूनं भारताच्या युवा क्रिकेटपटूंना पैलू पाडण्याचा विडा यशस्वीपणे उचललाय.


पृथ्वी शॉची प्रतिक्रिया


पृथ्वीने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'मी माझे वडील, कोच राहुल द्रविड आणि ज्वाला सरांच्या मंत्रावर इथेपर्यंत पोहोचलो. वर्ल्डकप दरम्यान राहुल सरांच्या क्लासमुळे आम्ही चॅम्पियन बनलो. राहुल सर म्हणतात की, क्रिकेट एक बॉलचा खेळ आहे. त्यामुळे प्रत्येक बॉलला सीरियस घ्या. आमच्या टीमने हा मंत्र स्विकारला. ज्य़ामुळे आम्ही चॅम्पियन बनलो.'


सुवर्ण आठवणी


पृथ्वीने म्हटलं की, 'त्यांच्यासाठी असलेल्या भावनांना शब्दांमध्ये व्यक्त करने शक्य नाही. त्यांने म्हटलं की, येथून अनेक सुवर्ण आठवणी घेऊन जात आहे. मी आता सांगू नाही शकत की मी आता काय वाटतं आहे. मी खूप खूश आहे. वर्ल्डकप जिंकून छान वाटतंय. हे आमच्यासाठी महत्त्वाचं नाही की आम्ही बॅटींग करावी की बॉलिंग. खेळ आम्ही खूप एन्जॉय केला. आम्ही टूर्नामेंटची वाट बघत आहोत. आम्ही एक-दोन वर्ष सोबत होतो. कर्णधार म्हणून मला चांगली टीम मिळाली. जेव्हा ही मी दबावात होतो तेव्हा टीमने मला साथ दिली.'


समर्थन पाहून आश्चर्य


शॉने भारतीय टीमला मिळालेल्या समर्थनावर देखील आश्चर्य व्यक्त केलं. त्याने म्हटलं की, ते सगळे आम्हाला बघण्यासाठी आले आणि पहिल्या बॉलपासून शेवटच्या बॉलपर्यंत साथ दिली. आम्हाला त्यांच्याकडून खूप प्रेम मिळालं. ज्याची आम्हाला कल्पना देखील नव्हती. आमच्या चांगल्या कामगिरी मागे हे देखील एक कारण आहे.


बॅटींगआधी टीमला काय सांगितलं यावर बोलतांना शॉ बोलला की, हा मोठा स्कोर नव्हता. पण मला असं नव्हतं वाटतं की याला टीमने हलक्यात घ्यावं. हा वर्ल्डकप फायनल होता आणि आम्हाला शांतचित्त राहून खेळायचं होतं.'