दुबई : 2021 च्या टी-20 वर्ल्डकपनंतर टीम इंडियाला आशिया कप-2022 च्या अंतिम फेरीतही प्रवेश मिळवता आला नाही. टीम इंडिया मोठ्या स्पर्धांमध्ये सतत फ्लॉप होतेय, त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होतेय. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडून करण्यात येत असलेल्या प्रयोगांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून, दरम्यान त्यांनी एका मुलाखतील टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल द्रविड म्हणले की, माझं काम फक्त कर्णधार आणि टीमला पाठिंबा देण्याची आहे. त्यांची सर्वोत्तम कामगिरी बाहेर काढण्याचं आमचं ध्येय आहे. पण जेव्हा खेळाडू मैदानात असतात, त्या वेळी योजना राबविण्याची जबाबदारी कर्णधार आणि खेळाडूंची असते. कठीण खेळपट्टीवर दोन-तीन सामने गमावल्याने टीम वाईट होत नाही. त्यामुळे यावर जास्त ओवररिएक्ट करण्याची गरज नाही.


टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पुढे म्हणाले की, रोहित शर्मा हा आरामशीर कर्णधार आहे. त्याचप्रमाणे टीममधील वातावरणही चांगलं आहे. आम्ही पहिले दोन सामने जिंकले, याचा अर्थ असा नाही की तुम्ही चांगली टीम आहात. तसंच आम्ही सलग दोन सामने हरलो, याचा अर्थ तुम्ही वाईट टीम आहात असाही होत नाही."


टीममधील वातावरण खूप चांगलं आहे. अशा परिस्थितीत आम्हाला काही बिघडवायचं नाही. हा एक प्रवास आहे ज्यावर आपण सर्वजण निघालो आहोत, असंही द्रविड म्हणालेत.


टीम इंडियाला आशिया कपचे पहिले दोनच सामने जिंकता आले होते, त्यानंतर टीम इंडियाने सुपर-4 स्टेजवर लागोपाठ दोन सामने गमावले. अखेर भारताने अफगाणिस्तानचा पराभव करून आशिया कपला निरोप दिला.