नवी दिल्ली : बीसीसीआयने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला भारत अ आणि अंडर १९ संघाच्या प्रशिक्षकपदी पुढील दोन वर्षांसाठी कायम ठेवले आहे. यासोबतच द्रविडच्या मानधनातही दुपटीने वाढ झालीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रशिक्षक राहुल द्रविडला आता वार्षिक मानधन ५ कोटी रुपये देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतलाय. गेल्या कॉन्ट्रॅक्टनुसार त्याला २.५ कोटी रुपये मानधन दिले जात असे. हे कॉन्ट्रॅक्ट ३१ मार्चला संपले होते.


शुक्रवारी बीसीसीआयने द्रविडचा भारत अ आणि अंडर १९ संघाच्या प्रशिक्षकपदाचा कालावधी पुढील दोन वर्षांसाठी वाढवलाय. दरम्यान, शुक्रवारीच द्रविडने आयपीएलमधील दिल्ली डेअरडेविल्सच्या मेंटर पदाचा राजीनामा दिला.