Rahul Dravid: टीम इंडियाचा (Team India) माजी खेळाडू आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) सध्या भारताचा कोच म्हणून भूमिका साकारतोय. सध्या राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चांगली कामगिरी करताना दिसतेय. एकेकाळी द्रविड देखील टीम इंडियाचा कर्णधार होता. तर आता लवकरच द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड (Anvay Dravid) देखील लवकरच कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दिसणार आहे.


Rahul Dravid चा लहान मुलगा बनला कर्णधार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा मुख्य कोच राहुल द्रविड़ (Rahul Dravid) यांचा लहान मुलगा अन्वय द्रविड़ कर्नाटकाच्या टीमचा कर्णधार बनला आहे. अन्वय अंडर 14 झोनल टूर्नामेंटचं नेतृत्व करताना दिसणार आहे. अन्वय त्याच्या वडिलांप्रमाणे उत्तम फलंदाजी करतो. यासोबत तो त्याच्या विकेटकीपिंगसाठी देखील प्रसिद्ध आहे.


अन्वयला एक मोठा भाऊ देखील आहे. ज्याचं नाव समित द्रविड आहे. समित देखील उत्तम फलंदाज आहे. हे दोघंही भाऊ वडिलांप्रमाणे गोलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवतात. आता आगामी इंटर झोनल टूर्नामेंटमध्ये अन्वयच्या खांद्यावर कर्णधारपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. अन्वय त्याची कामगिरी कशी बजावतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


अन्वय-समितची उत्तम जोडी


U-14 इंटर झोनल टूर्नामेंटमध्ये कर्नाटकाचा कर्णधार बनलेला अन्वय याने दोन वर्षांपूर्वी आपला भाऊ समितसोबत एक तुफान खेळी केली होती. हा सामना BTR Shield अंडर 14 स्कूल टूर्नामेंट होती. ज्यामध्ये द्रविडच्या दोन्ही मुलांनी डबल सेंच्युरीची पार्टनरशिप केली होती. यावेळी विकेटकीपर फलंदाज अन्वयने 90 रन्सची खेळी केली होती. या दोन्ही भावांच्या उत्तम कामगिरीमुळे त्यांची टीम स्कूल टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्यास यशस्वी झाली होती.