Samit Dravid in U19 Vinoo Mankad Trophy : परिस्थिती कितीही बिकट असली तरी मैदानात नेहमी बर्फासारखा शांत राहुन फलंदाजी करणाऱ्या खेळाडूचा उल्लेख केल्यावर एकच नाव समोर येतं ते म्हणजे राहुल द्रविड (Rahul Dravid)... बॉल आडवा तिडवा आला तरी विकेट सांभाळणारा 'द वॉल' आता टीम इंडियाचा प्रशिक्षक झाला आहे. राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने पुन्हा एकदा आशिया कप (Asia Cup) नावावर केला. त्याचबरोबर आगामी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला मार्गदर्शन करण्यासाठी द्रविड यांचा सल्ला मोलाचा ठरेल. एकीकडे वर्ल्ड कपची तयारी करत असताना द्रविड यांना गुड न्यूज मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडचा मुलगा समित (Samit Dravid) याची शनिवारी आगामी विनू मांकड ट्रॉफीसाठी कर्नाटकच्या १५ सदस्यीय संघात निवड करण्यात आली. 12 ते 20 ऑक्टोबर दरम्यान हैदराबाद येथे 19 वर्षांखालील स्पर्धा होणार आहे. कर्नाटकचे नेतृत्व धीरज जे. गौडा करतील तर धुर्व प्रभाकर उपकर्णधार असेल.


कसा असेल कर्नाटकचा संघ?


धीरज जे गौडा (C), धुर्व प्रभाकर (VC), कार्तिक एसयू, शिवम सिंग, हर्षिल धर्मानी (WK), समित द्रविड, युवराज अरोरा (WK), हार्दिक राज, आरव महेश, आदित्य नायर, धनुष गौडा, शिखर शेट्टी, समर्थ नागराज, कार्तिकेय केपी, निश्चिथ पै.



दरम्यान, राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाची वर्ल्ड कपसाठी निवड झाली आहे. राहुल द्रविड यांनी सिलेक्ट न झालेल्या खेळाडूंना पुन्हा प्रॅक्टिस करण्याचा सल्ला दिलाय. द्रविड यांचा एक निर्णय सध्या चर्चेच्या भोवऱ्यात आहे. राहुल द्रविडने ( Rahul Dravid ) पहिल्या वनडेदरम्यान रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि विराट कोहलीला विश्रांती दिली आहे. त्यामुळे आता द्रविड यांनी असा निर्णय का घेतला? ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत पहिलाच सामना खेळणार आहे. त्यामुळे रोहित आणि विराटला संघात जागा द्यायला हवी होती, अशी चर्चा सुरू आहे.