Samit Dravid Selected In U19 Team India : भारतासाठी क्रिकेट खेळलेल्या काही दिग्गज क्रिकेटपटूंची मुलं देखील क्रिकेटमध्ये करिअर करू पाहत आहेत. यापैकी काहींना वडिलांप्रमाणे टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली तर काहींना यात अपयश आले. भारताचा माजी क्रिकेटर आणि हेड कोच राहिलेला राहुल द्रविड याचा मुलगा समित वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून क्रिकेटमध्ये करिअर करत असून आता त्याची टीम इंडियात एंट्री झाली आहे. 


समित द्रविडला टीम इंडियात मिळाली संधी : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा माजी हेड कोच राहुल द्रविड़ याचा मुलगा समित द्रविड याला पहिल्यांदाच टीम इंडियात संधी मिळाली आहे. समितला ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सिरीजसाठी भारताच्या अंडर १९ संघात स्थान मिळालं आहे. त्याला ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वनडे आणि चार दिवसीय सीरिज खेळण्याची संधी मिळणार आहे. हे सामने क्रमशः पुडुचेरी आणि चेन्नईमध्ये खेळले जातील. भारताचा अंडर 19 संघाचं कर्णधारपद मोहम्मद अमानकडे सोपवण्यात आलं असून  चार दिवसीय सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व पटवर्धन करेल. 



समितचे क्रिकेटमधील प्रदर्शन : 


समित द्रविड हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. काही दिवसांपूर्वीच महाराजा केएससीए महारा टी20 ट्रॉफीमध्ये त्याने केलेल्या जबरदस्त फलंदाजीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. समितने मैसूर वॉरियर्सकडून खेळताना ७ सामन्यात अनुक्रमे 7, 7, 33, 16, 2, 12 आणि 5 अशा धावा केल्या होत्या. 


ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरिजसाठी भारताचा अंडर 19 संघ : 


रुद्र पटेल (उपकर्णधार), साहिल पारख, कार्तिकेय केपी, मोहम्मद अमान (कर्णधार), किरण चोरमले, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर) , हरवंश सिंह पंगलिया (विकेटकीपर), समित द्रविड़, युद्धजीत गुहा, समर्थ एन, निखिल कुमार, चेतन शर्मा, हार्दिक राज, रोहित राजावत, मोहम्मद एनान.


हेही वाचा : धोनी सोबत खेळलेला हा क्रिकेटर पोटासाठी करतोय बस ड्रायव्हरचं काम


ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार दिवसीय सीरीजसाठी भारताचा अंडर 19 संघ : 


वैभव सूर्यवंशी, नित्या पंड्या, विहान मल्होत्रा ​​(उपकर्णधार), सोहम पटवर्धन (कर्णधार), कार्तिकेय केपी, समित द्रविड़, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), हरवंश सिंह पंगलिया (विकेटकीपर), चेतन शर्मा, समर्थ एन, आदित्य रावत, निखिल कुमार, अनमोलजीत सिंह, आदित्य सिंह, मोहम्मद एनान.