जयपूर : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील T20 मालिका सुरु झाली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. या मालिकेत भारताच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्मा सांभाळत आहे, तर पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली ही पहिलीच मालिका आहे. (Team india for T20 world cup 2022)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

UAE मध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या T20 विश्वचषकात भारताची कामगिरी खराब राहिली आणि उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही. आता प्रशिक्षक द्रविड आणि संघाच्या नजरा 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या पुढील विश्वचषकावर आहेत. रोहित शर्मानेही मोजक्या शब्दात याकडे लक्ष वेधले.


न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकली. त्यानंतर तो म्हणाला, 'आम्ही आधी गोलंदाजी करू. विकेट चांगली दिसत आहे, आपण लक्ष्याचा पाठलाग करावा असे वाटले. काही दिवस सराव करताना खूप दव पडले होते. हे चांगले आहे.'


तो पुढे म्हणाला, 'पुढील विश्वचषकावर आमची नजर आहे, अजून वेळ असला तरी आम्ही आमच्या पर्यायांवर काम करण्याचा प्रयत्न करू. काही निकाल लगेच मिळू शकत नाहीत, पण प्रक्रिया महत्त्वाची असेल.' 


प्लेइंग-इलेव्हनबद्दल रोहित म्हणाला, 'श्रेयस अय्यर संघात परतला आहे, व्यंकटेश अय्यर पदार्पण करत आहे. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज आणि दीपक चहर हे वेगवान गोलंदाज म्हणून खेळतील. आम्ही तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटूंसोबत खेळत आहोत.


जयपूर T20 साठी भारताची प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि मोहम्मद सिराज