नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने विराट कोहलीबाबत मोठं विधान केलं आहे. द वॉल या नावाने ओळखला जाणारा माजी फलंदाज राहुल द्रविडने म्हटलं आहे की, संघ त्या खेळाडूच्या ताकदीवर ही जिंकतो ज्याच्या हातावर टॅटू नसतो. विजयासाठी हे आवश्यक नाही की तो खेळाडून मॅचोमॅन सारखा असावा किंवा रॉकस्टार असावा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कार्यक्रमादरम्यान, त्याने म्हटले की, कधी-कधी विराट अपमानजनक पद्धतीने वागतो. अनेकदा मी कोणत्याही सिरीजच्या आधी त्याचे असे स्टेटमेंट वाचतो पण जर त्यामुळे त्यामुळे जर तो चांगली कामगिरी करु शकत असेल तर ते तो करु शकतो.


कोहली आणि कुंबळे यांच्यातील वादावर त्याने विराट कोहलीचा बचावही केला. तो म्हणाला की, विराट हा खेळापेक्षा खूपच शक्तिशाली आहे. ते कोच बनवण्याचा आणि हटवण्याचा देखील प्रयत्न करु शकतो.


पुढे द्रविडने म्हटलं की, कुंबळे आजही लेजेंड आहे. आजच्या काळात प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यामधील वाद हा सामान्य झाला आहे. बऱ्याचदा ते एकमेकांशी असहमत असतात. मी केवळ अंडर 19 चा कोच आहे. माझ्याबाबतीत असे होऊ शकते की कर्णधार माझ्याशी असहमत असेल. धोनीच्या निवृत्तीबद्दल विचारले असता द्रविडने म्हटलं की जो पर्यंत निवड समिती धोनीची निवड करेल तो पर्यंत तो खेळू शकतो.