मुंबई : Cricket News : भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या  (NCA क्रिकेट प्रमुखपदासाठी पुन्हा अर्ज केला आहे आणि नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या टी -२० विश्वचषकानंतर तो आपल्या वरिष्ठ राष्ट्रीय संघात मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची जागा घेईल, अशी अटकळ बांधली आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) द्रविड याचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर अर्ज मागवले होते. नवीन घटनेनुसार करारात मुदतवाढीची तरतूद नाही आणि निवडीची प्रक्रिया नव्याने सुरू केली जाते.


द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक बनू शकणार नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले, “होय, राहुल यांनी पुन्हा क्रिकेटच्या प्रमुख पदासाठी अर्ज केला आहे. एनसीएचा चेहरा बदलण्यासाठी त्याने केलेले उत्कृष्ट काम लक्षात घेता, तो या पदावर राहू शकतो हे समजून घेण्यासाठी आपण प्रतिभाशाली असण्याची गरज नाही. आतापर्यंत या पदासाठी राहुल वगळता कोणत्याही मोठ्या नावाच्या व्यक्तीचा, खेळाडूचा अर्ज आलेला नाही.


इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी बीसीसीआयने अर्ज सबमिट करण्याची तारीख काही दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते. बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी 15 ऑगस्टपासून काही दिवसांची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे सूत्राने सांगितले. 


 ही फक्त एक औपचारिकता


जेव्हा राहुल स्पर्धेत असतो, तेव्हा सर्वांना माहित असते की या पदासाठी अर्ज करणे फारसा उपयोग होत नाही. ही फक्त एक औपचारिकता आहे. मात्र, निष्पक्ष असणे, जर कोणाला असे वाटत असेल की त्याला दावा सादर करायचा असेल तर आणखी काही दिवस दिले आहेत, असे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


द्रविड पूर्णवेळ प्रशिक्षक होणार असल्याच्या बातम्या आल्या. श्रीलंका दौऱ्यानंतर द्रविडने भारतीय संघासोबत पूर्णवेळ भूमिकेबद्दल शंका व्यक्त केली होती. त्याचा अर्ज मात्र याची पुष्टी करतो की त्याला अजूनही युवा क्रिकेटपटूंसोबत काम करून राष्ट्रीय क्रिकेट संघाला मदत करायची आहे. 


दरम्यान, दुखापतींशी झुंज देत असलेले वरुण चक्रवर्ती आणि कमलेश नागरकोटी पुन्हा एकदा NCA मध्ये पोहोचले आहेत. शुभमन गिल देखील एनसीएमध्ये आहेत. कोलकाता नाईट रायडर्सच्या या तीन खेळाडूंची फिटनेस चाचणी घेतली जाईल आणि या आधारावर ते इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळू शकतील की नाही हे ठरवले जाईल.