आताची मोठी बातमी! टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याबाबत बीसीसीआयचा मोठा निर्णय
Rahul Dravid Team India Head Coach: आयसीसी विश्वचषकानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना डच्चू मिळणार अशी चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरु होता. यासाठी बीसीसीआयची एक महत्वाची बैठक झाली. आता बीसीसीआयने राहुल द्रविडबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Rahul Dravid Team India Head Coach: भारतात नुकतीच आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. या स्पर्धेनंतर टीम इंडियाचे (Team India) मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळही संपत होता. त्यामुळे भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळणार अशी चर्चा सुरु झाली होती. राहुल द्रवडि यांच्या जागी भारताचा माजी दिग्गज फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्या नावाचीही चर्चा होती. पण आता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात राहुल द्रविडच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असतील हे निश्चित झालं आहे.
बीसीआयने घेतला निर्णय
विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचा कोच बदलला जाणार अशी जोरदार चर्चा होती. यावर आता स्वत: बीसीसीआयने उत्तर दिलं आहे. राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहाणार असल्याची मोठी घोषणा बीसीसीआयने केली आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर राहुल द्रविड यांचा कार्यकाळही संपला होता. राहुल द्रविड यांच्या जागी व्ही व्ही एस लक्ष्मण यांची मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झालं होतं. पण त्या केवळ चर्चा ठरल्या. आता बीसीसीआयच्या घोषणेनंतर राहुल द्रविड टीम इंडियाबरोबर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहेत.
राहुल द्रविड यांनी मानले आभार
मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवल्यानंतर राहुल द्रविड यांनी बीसीसीआयचे आभार मानले आहेत. आपल्या पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याबद्दल आभारी असल्याचं द्रविड यांनी सांगितलं. बीसीसीआयने नेहमीचे आपले प्लान आणि व्हिजनचं समर्थन केलं, राहुल द्रविड यांनी आपल्या कुटुंबियांचेही आभार मानले आहेत. आपल्या मागे कुटुंबियं नेहमीच समर्थपणे उभं राहिल्याचं त्यांनी सांगितलं. विश्वचषकानंतर आता आपल्यासमोर मोठी आव्हान असल्याचंही राहुल द्रविड यांनी सांगितलंय.
द्रविड यांना का मिळाली पुन्हा जबाबदारी?
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनीही राहुल द्रविड यांचे आभार मानले आहेत. आपल्या विनंतीला मान देऊन मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहिल्याबद्दल जय शाह यांनी राहुल द्रविड यांनी धन्यवाद दिले आहेत. द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ कमालीचा आहे. विश्वचषकात टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकले. यात राहुल द्रविड यांचा मोलाचं योगदान होतं, या शानदार कामगिरीमुळेच राहुल द्रविड प्रशिक्षकपदी कायम ठेवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतल्याचं जय शाह यांनी सांगितलं. राहुल द्रविड यांना बीसीसीआयकडून भविष्यात सर्वोतोपरी मदत आणि पाठिंबा मिळेल असंही जय शाह यांनी आश्वस्त केलं आहे.