राहुल द्रविड भारत `अ` आणि अंडर १९च्या प्रशिक्षकपदी कायम
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) ने शुक्रवारी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला पुढील दोन वर्षांसाठी भारत अ आणि अंडर १९ संघासाठीच्या प्रशिक्षकपदी कायम ठेवलेय.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) ने शुक्रवारी भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडला पुढील दोन वर्षांसाठी भारत अ आणि अंडर १९ संघासाठीच्या प्रशिक्षकपदी कायम ठेवलेय.
बीसीसीआयकडून शुक्रवारी ही घोषणा करण्यात आली. गेल्या दोन वर्षात अनेक द्रविडने अनेक प्रतिभावान युवा खेळाडूंचे टॅलेंट समोर आणलेय. पुढील दोन वर्षांसाठी द्रविड भारत अ आणि अंडर १९ संघासाठीच्या प्रशिक्षकपदी कायम राहणार आहे.
२०१५मध्ये दोन्ही संघाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या मार्गदर्शनाखील भारताच्या युवा क्रिकेटपटूंनी देशातच नव्हे तर देशाबाहेरील स्पर्धांमध्येही चांगली कामगिरी केली. त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचला होता.