मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडची भारतीय वरिष्ठ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर न्यूझीलंड दौरा हा राहुल द्रविडचा पहिला दौरा असणार आहे. टी 20 वर्ल्ड कपनंतर विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ हा टी 20 वर्ल्ड कपनंतर संपणार आहे. द्रविड पुढील 2 वर्ष टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभळणार आहे. प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर राहुलने आनंद व्यक्त केला तसेच माझ्यासाठी ही सन्मानाची बाब असल्याचंही त्याने म्हंटलं. (Rahul Dravids first reaction after being appointed as coach of team india) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द्रविड काय म्हणाला?


"टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड होणं ही माझ्यासाठी सन्माननीय बाब आहे. मी टीम इंडियासोबत काम करण्यासाठी उत्साहित आहे. रवी शास्त्रींच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने खूप प्रगती केली. टीम इंडियासोबत राहून मी अशाच पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल", असं द्रविड म्हणाला.


"टीम इंडियामध्ये सध्या खेळत असलेल्या बहुतांश खेळाडूंसोबत मी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (National Sports Academy) आणि अंडर 19 किंवा 'टीम इंडिया साठी एकत्र राहिलो आहे. या खेळाडूंमध्ये स्वत:मध्ये बदल घडवण्याची जिद्द आहे. पुढील 2 वर्षात अनेक मोठ्या स्पर्धा होणार आहेत. मी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसह भविष्यात आपल्या क्षमतेवर काम करण्याचा प्रयत्न करणार आहे", असा विश्वास द्रविडने व्यक्त केला.    


राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. हा वर्ल्ड कप 2018 मध्ये न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात आला होता. द्रविडने या व्यतिरिक्त इंडिया ए टीमलाही क्रिकेटचे धडे दिले आहेत. सध्या द्रविड नॅशनल क्रिकेट एकेडमीची जबाबदारी सांभाळत आहे. टीम इंडियाची बी टीम जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यात राहुलर द्रविडने मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली होती.