हरमनप्रीत कौरवर रेल्वेने ठोठावला २७ लाख रुपयांचा दंड
महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये धुंवाधार बॅटिंग करत जगभरातील मीडियाचे लक्ष वेधून घेणाऱी भारतीय महिला क्रिकेटर हरमनप्रीत कौर वादाच्या भोवऱ्यात अडकलीये.
नवी दिल्ली : महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये धुंवाधार बॅटिंग करत जगभरातील मीडियाचे लक्ष वेधून घेणाऱी भारतीय महिला क्रिकेटर हरमनप्रीत कौर वादाच्या भोवऱ्यात अडकलीये.
खरंतर, भारतीय रेल्वेने हरमनप्रीतला चांगल्या खेळाचे बक्षिस म्हणून नोकरी दिली होती. मात्र यावेळी कमीत काम पाच वर्षे नोकरी करावी लागेल अशी अटही ठेवली होती. दरम्यान हरमनप्रीतने हा करार तोडताना तीन वर्षातच नोकरीचा राजीनामा दिला. त्यामुळे रेल्वेने तिच्यावर २७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच जोपर्यंत हरमनप्रीत दंडाची रक्कम भरत नाही तोपर्यंत तिचा राजीनामा मंजूर केला जाणार नसल्याचे रेल्वेने म्हटलेय.
यावर हरमनप्रीतने रेल्वेने पाच महिन्यांपासून पगार दिला नसल्याचा आरोप केलाय. हरमनप्रीतने महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध धमाकेदार १७१ धावांची खेळी करताना संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला होता.
रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाच्या सचिव रेखा यादव यांच्या माहितीनुसार, हरमन सध्या बिग बॅश लीगसाठी सुट्टीवर आहे. ही खाजगी स्पर्धा आहे. त्यामुळे त्याला आम्ही एनओसी सर्टिफिकेट दिलेय. ती अचानक सुट्टीवर गेलीये. त्यामुळे पगार देण्याचा प्रश्वच उरत नाही. हरमनप्रीत मूळची पंजाबची आहे. त्यामुळे तिला पंजाब पोलीसमध्ये नोकरी करायची आहे.
द. आफ्रिका दौऱ्यासाठी हरमनप्रीतची संघात निवड
द. आफ्रिकेविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आलीये. यात हरमनप्रीतची निवड करण्यात आलीये. बीसीसीआयने बुधवारी याबाबत माहिती दिली.