जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये पुन्हा पावसाचा व्यत्यय आला आहे. पावसामुळे सामना थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर ४३ रन्सवर एक विकेट असा आहे. जसप्रीत बुमराहनं आफ्रिकेचा कॅप्टन मार्करमला एलबीडब्ल्यू केल्यानंतर खेळ थांबवण्यात आला आहे. तर हाशीम आमला १९ रन्सवर नाबाद खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी आणखी २४७ रन्सची आवश्यकता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वनडेमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आणि ५० ओव्हरमध्ये २८९/७ एवढा स्कोअर केला. शिखर धवननं या मॅचमध्ये शतक झळकावलं तर कॅप्टन विराट कोहलीनं अर्धशतक केलं. धवन आणि कोहलीची विकेट गेल्यावर भारतीय बॅट्समनची पडझड पाहायला मिळाली. अखेर धोनीनं भारताचा डाव सावरायला मदत केली.


शिखर धवनचं वनडे क्रिकेटमधलं हे १३वं शतक आहे. मुख्य म्हणजे शिखर धवननं त्याच्या १००व्या वनडेमध्ये हे शतक ठोकलं आहे. शिखर धवन १०५ बॉल्समध्ये १०९ रन्स करून आऊट झाला. धवनच्या या खेळीमध्ये ११ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. तर विराट कोहली ८३ बॉल्समध्ये ७५ रन्स करून आऊट झाला. विराटनं ७ फोर आणि १ सिक्स मारली. तर धोनीनं ४३ बॉल्समध्ये ४२ रन्स केल्या, यामध्ये ३ फोर आणि १ सिक्सचा समावेश होता. विराट कोहलीनं याआधी सीरिजमध्ये दोन शतकं झळकावली आहेत. तर शिखरनं या शतकाआधी या सीरिजमध्ये अर्धशतकही केलं होतं.


६ वनडेच्या या सीरिजमध्ये भारत ३-०नं आघाडीवर आहे. ही मॅच जिंकून सीरिज खिशात टाकण्याची संधी आता भारतीय बॉलर्सपुढे असणार आहे. भारताचे स्पिनर्स युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. पहिल्या तीन मॅचमध्ये ३० पैकी २१ विकेट या दोघांनी घेतल्या आहेत. तर विराट कोहलीनंही मागच्या मॅचमध्ये १६० रन्सची खेळी केली होती.


स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा