MI vs RCB Weather Forecast: आज आयपीएलमध्ये मुंबई विरूद्ध बंगळूरू यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात सर्वांचं लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर असणार आहे. वानखेडेच्या मैदानावर कोणती टीम बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होणार असून या सामन्यात पावसाचा व्यत्यय ठरणार का हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे. 


मुंबईमध्ये कसं असणार वातावरण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज मुंबईचं तापमान 30 अंश सेल्सिअसच्या जवळपास राहणार आहे. मात्र ज्यानुसार वेळ जाणार आहे त्यानुसार तापमान कमी होत जाईल. सामना संपेपर्यंत तापमान 28 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पण सामन्यादरम्यानचे तापमान 31 अंश सेल्सिअस राहणार आहे. याशिवाय आज मुंबईत पावसाची शक्यता नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याचा आनंद लुटता येणार आहे.


पॉईंट्स टेबलमध्ये कोणत्या ठिकाणी आहे दोन्ही टीम्स


मुंबई इंडियन्सचे 4 सामन्यांत 2 गुण झाले आहेत. हार्दिक पंड्याचा टीम पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे 5 सामन्यांतून 2 गुण आहेत. फाफ ड्यू प्लेसिसची हा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्सशिवाय, मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. 


कशी आहे हेड-टू-हेडची आकडेवारी


मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आतापर्यंत आयपीएलमध्ये 32 वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सने 18 वेळा तर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने 14 वेळा जिंकले. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्सचा वरचढ असल्याची आकडेवारीवरून दिसून येते.


मुंबईची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - 


इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह.


आरसीबीची संभाव्य प्लेइंग इलेव्हन -


विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, सौरव चौहान, कॅमेरॉन ग्रीन, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रीस टोपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.