RR Vs RCB: राजस्थान की बंगळूरू, कोणाचं पारडं जड? पाहा हेड-टू-हेडची आकडेवारी
Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru: यंदाच्या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सच्या टीमने एकंही सामना गमावलेला नाही. तर दुसरीकडे बंगळुरूने चारपैकी तीन सामने गमावले आहेत. अशा परिस्थितीत आज आरसीबीला कोणत्याही परिस्थितीत विजयाची नोंद करायची आहे.
Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru: आयपीएल 2024 ला सुरुवात झाली असून या लीगमध्ये आज 19 वा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना राजस्थान रॉयल्स विरूद्ध रॉयल्स चॅलेंजर बंगळूरू यांच्यामध्ये रंगणार आहे. जयपुरच्या सवाई मान सिंह स्टेडियमवर या दोन्ही टीम आमने-सामने येणार आहेत. या सामन्यात कोण बाजी मारणार हे पहावं लागणार आहे.
यंदाच्या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सच्या टीमने एकंही सामना गमावलेला नाही. तर दुसरीकडे बंगळुरूने चारपैकी तीन सामने गमावले आहेत. अशा परिस्थितीत आज आरसीबीला कोणत्याही परिस्थितीत विजयाची नोंद करायची आहे. आजच्या सामन्यात कोणाचं पारड जड आहे ते पाहूयात.
राजस्थान रॉयल्सचा चांगला खेळ सुरु
राजस्थान रॉयल्स आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत खूप चांगल्या फॉर्ममध्ये दिसून येतेय. यावेळी टीमने 3 सामने खेळले असून तिन्ही सामने जिंकले आहेत. राजस्थानने पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा 20 रन्सने पराभव केला. यानंतर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 12 रन्सने तर तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 6 रन्सने पराभव केला होता.
तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची अवस्था फारशी चांगली नाहीये. या टीमने आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यापैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. बंगळुरूला राजस्थानविरुद्ध सिझनमधील दुसरा मिळवायचा आहे. आता जयपूरच्या मैदानावर आज कोणती टीम बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
कसा आहे हेड-टू-हेडचा रेकॉर्ड?
आयपीएलमध्ये राजस्थान आणि बेंगळुरूची टीम आतापर्यंत 30 वेळा आमनेसामने आल्या आहेत. या काळात राजस्थानचा वरचढ ठरल्याचं दिसतंय. संजू सॅमसनच्या टीमने यामध्ये आतापर्यंत 15 वेळा विजय मिळवला आहे. आरसीबीने केवळ 12 सामने जिंकले आहेत. तर यामध्ये 3 सामने असे आहेत, ज्यांचा निकाल लागला नाही.
RCB विरुद्ध राजस्थान रॉयल्सची संभाव्य इलेव्हन
जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), रियन पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, नांद्रे बर्गर, आवेश खान, ट्रेंट बोल्ट.
राजस्थान रॉयल्सविरुद्ध आरसीबीची संभाव्य इलेव्हन
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, अनुज रावत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, मयंक डागर, रीस टोपली, मोहम्मद सिराज, यश दयाल.