Rajasthan Royals Joe Root: वर्ल्ड कप संपल्यानंतर आता क्रिकेटप्रेमींना आयपीएलचा थरार पाहता येणार आहे. दरम्यामन आयपीएल सुरु होण्याआधीच क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी बातमी आली आहे. आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा इंग्लंडचा फलंदाज जो रूटने येत्या आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तो पुढील कोणत्याही आयपीएल हंगामात खेळताना दिसणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. जो रुटच्या फॅन्ससाठी ही धक्कादायक बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील आयपीएल हंगामातून जो रुटने पदार्पण केले होते. आता फ्रँचायझीनेही सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या आयपीएलमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाला दुजोरा दिला आहे.


जो रूट आयपीएल 2024 खेळणार नाही


इंग्लंडचा फलंदाज जो रूट आयपीएलमध्ये यापुढे सहभागी होणार नाही. आयपीएल 2024 च्या रिटेन्शन डेडलाइनच्या आधी ही बातमी आली आहे. फ्रँचायझीने एक निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती दिली आहे. इंग्लंडच्या सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या रूटने गेल्या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याला राजस्थान रॉयल्सने मिनी लिलावात विकत घेतले. 2023 च्या आयपीएलमध्ये रूटने फ्रँचायझीसाठी फक्त 3 सामने खेळले.


आमच्या रिटेन्शन चर्चेदरम्यान, रूटने आम्हाला आयपीएल 2024 मध्ये सहभागी न होण्याच्या निर्णयाबद्दल माहिती दिली. फार कमी कालावधीत, जो रूटने संघावर सकारात्मक प्रभाव पाडल्याचे राजस्थान रॉयल्स फ्रँचायझी संचालक कुमार संगकाराने सांगितले. फ्रॅंचायझी आणि टीममधील खेळाडू जो रुटची उर्जा आणि त्याने रॉयल्ससाठी केलेली खेळी नक्की मिस करतील. आम्ही त्याच्या निर्णयाचा पूर्ण आदर करतो, असेही ते म्हणाले. तसेच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या होत्या. 


बेन स्टोक्स देखील आयपीएलमधून बाहेर 


IPL 2024 मधून बाहेर पडणारा रूट हा पहिला इंग्लिश क्रिकेटर नाही. याआधी स्टार इंग्लिश अष्टपैलू बेन स्टोक्सने देखील त्याच्या कामाचा ताण आणि फिटनेस लक्षात घेऊन आयपीएल 2024 मध्ये सहभागी होणार नसल्याची घोषणा केली होती. स्टोक्सला चेन्नई सुपर किंग्जने 16.25 कोटी रुपयांना खरेदी केले होते. गेल्या मोसमातही दुखापतीमुळे तो बहुतांश सामन्यांमध्ये संघाचा भाग होऊ शकला नव्हता.