RR vs RCB : जॉस बटलरचा आरसीबीवर `हल्लाबोल`, किंग कोहलीचं शतक व्यर्थ, राजस्थानचा 6 विकेट्सने विजय
RR vs RCB, IPL 2024 : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील 19 व्या सामन्यात आरसीबीने दिलेल्या 184 धावांचं आव्हान पार करता राजस्थानने 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. जॉस बटलरची शतकीय खेळी (Jos buttler Century) विराट कोहलीच्या शतकीय खेळीवर भारी पडली.
Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru : आयपीएलचा 19 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने बंगळुरूवर 6 गडी राखून विजय मिळवला आहे. विराट कोहलीने (Virat Kohli Century) शतक ठोकून देखील आरसीबीचा पराभव झाल्याने आता आरसीबीचं कसं होणार? असा सवाल विचारला जाऊ लागलाय. तर दुसरीकडे जॉस बटलर (Jos buttler) अन् कॅप्टन संजू सॅमसनच्या (Sanju Samson) धमाकेदार पार्टनरशीपमुळे राजस्थानने सलग चौथा विजय मिळवून पाईंट्स टेबलवर अव्वल स्थान मिळवलं आहे.
यशस्वी जयस्वालची विकेट लवकर गेल्यानंतर कॅप्टन संजू सॅमसन आणि जॉस बटलर यांनी आक्रमक सुरूवात केली. जॉस बटलर याने 30 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलंय. त्याच्या या खेळीमुळे आता राजस्थान 10 ओव्हरमध्ये 95 धावांवर पोहोचली. दोन्ही खेळाडूंनी अर्धशतक पार केल्यानंतर आक्रमक खेळी केली अन् राजस्थानसाठी विजयाची दारं उघडली. संजू सॅमसन, ध्रुव जुरैल आणि रियान पराग अशी एकामागून एक तीन विकेट्स गेल्या. मात्र, बटलर मैदानात पाय रोवून उभा होता. राजस्थानला विजयासाठी 1 रन हवी असताना बटलर 94 धावांवर खेळत होता. अखेरच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर बटलरने सिक्स मारला अन् राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि कर्णधार फाफ डुप्लेसिस यांनी राजस्थान रॉयल्सविरुद्ध आरसीबीला वेगवान सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी पॉवरप्ले संपेपर्यंत दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकी पार्टनरशिप केली. कोहली आणि फाफ डुप्लेसिस यांनी 125 रन्सची पार्टनरशिप केली. आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध शतक झळकावलं. कोहलीने 67 चेंडूत आयपीएलमधील आठवं शतक पूर्ण केले. फाफ डुप्लेसिसची विकेट गेल्यानंतर मॅक्सवेल मैदानावर आला. मात्र, अवघा 1 रन करून माघारी परतला. मात्र विराटने अखेरपर्यंत झुंज दिली. विराटने 113 धावा केल्या अन् आरसीबीला 183 धावांवर पोहोचवलं. राजस्थानकडून युझवेंद्र चहलला 2 विकेट्स मिळाल्या. चहलशिवाय एकाही गोलंदाजाला खास कामगिरी करता आली नाही.
राजस्थान रॉयल्स - यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरे, शिमरन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू - विराट कोहली. फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, सौरव चौहान, रिन टोपली, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.