Ramiz Raja On Babar Azam: पाकिस्तानचा लाडका बॉबी (Bobby) म्हणजे पाकिस्तानचा क्रिकेट संघाचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) याने आपल्या चमकदार कामगिरीने पाकिस्तानला एका नव्या उंचीवर पोहोचवलं आहे. बाबर आझमने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात शतक झळकावलं आणि एक इतिहास रचला आहे. एक कर्णधार म्हणून तो आता टी-ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारा खेळाडू बनला आहे. त्यामुळे त्याने भारताच्या रोहित शर्माला (Rohit Sharma) देखील मागे सोडलंय. बाबरच्या या कामगिरीवर अख्खं पाकिस्तान जल्लोष करत असल्याचं दिसतंय. अशातच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी बाबर आझम याची तुलना जगातील महान फलंदाज डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांच्याशी केली आहे.


काय म्हणाले Ramiz Raja ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबर आझमच्या यशाचा आधार म्हणजे त्याचे टेकनिक आणि स्वभाव. त्याला कोणतीही टेकनिकल समस्या नाही, मग ती गवताची हिरवीगार खेळपट्टी असो किंवा जिथं गोलंदाजांना सहसा संघर्ष करावा लागतो अशी कराचीसारखी सपाट खेळपट्टी, बाबर सर्व मैदानावर टिकून राहतो, असं राजा म्हणतात.


आमचा बाबर आझम डॉन ब्रॅडमनपेक्षा कमी नाही. व्हाईट बॉलच्या क्रिकेटमध्ये चांगली आकडेवारी देऊन तो जगातील सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. एवढ्या जोखमीच्या फॉरमॅटमधील खेळाडूकडून इतकं सातत्य खेळताना मी पाहिलं नाही, असं म्हणत रमीज राजा यांनी बाबर आझमचं (Ramiz Raja On Babar Azam) तोंडभरून कौतूक केलंय.


एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारा तो खेळाडू आहे. त्याने व्हिव्ह रिचर्ड्स सारख्या अनेक दिग्गजांना मागे सोडलंय, ही आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. यामुळेच पाकिस्तान वनडे क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा संघ बनला आहे, असंही रमीज राजा म्हणाले आहेत.


आणखी वाचा - PSL 2023: एक घाव दोन तुकडं... नाद करा पण Shaheen Afridi चा कुठं! पहिल्याच बॉलवर मोडली बॅट, पाहा Video


दरम्यान, टी-ट्वेंटी इंटरनॅशनलमध्ये (T20 Internationals) सर्वाधिक शतक सध्या बाबरच्या नावावर आहे. त्याने आत्तापर्यंत 3 शतकं झळकावले आहेत. तर भारताच्या रोहित शर्माने 2 शतकं ठोकली आहेत. त्याचबरोबर एरोन फिंच, शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिसने प्रत्येकी 1-1 शतक झळकावले आहेत.