कडक! Ranji Trophy मध्ये 22 वर्षाच्या फलंदाजाचा धमाका, पदार्पणातच खणखणीत त्रिशतक
आतापर्यंत भल्या भल्या फलंदाजांना न जमलेला कारनामा या फलंदाजाने करुन दाखवला आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटच्या इतिहासात असा कारनामा करणारा हा पहिला फलंदाज ठरला आहे.
मुंबई : रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेला तब्बल 2 वर्षांनंतर सुरुवात झाली. या स्पर्धेच्या सुरुवातीला अनेक युवा आणि अनुभवी खेळाडूंनी शतक ठोकत जोरदार सुरुवात केली. मात्र असा एक फलंदाज आहे ज्याने झोकात सुरुवात करत धमाका केलाय. या फलंदाजाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आतापर्यंत भल्या भल्या फलंदाजांना न जमलेला कारनामा या फलंदाजाने करुन दाखवला आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटच्या इतिहासात असा कारनामा करणारा हा पहिला फलंदाज ठरला आहे. (ranji trophy mizoram vs bihar sakibul gani scored triple hundred and break madhya pradesh ajay rohera record in debut at kolkata)
पदार्पणातच त्रिशतक
बिहारच्या साकिबुल गणीने (Bihar Sakibul Gani) फर्स्ट क्लास डेब्यूमध्ये त्रिशतक झळकावलं. या त्रिशतकासह त्याने रेकॉर्ड ब्रेक केलाय. साकिबुलने मिझोराम (Mizoram) विरुद्धच्या सामन्यात ही शानदार खेळी केली. साकिबुलने 387 चेंडूत 50 चौकार ठोकत हे त्रिशतक पूर्ण केलंय. साकिबुलने एकूण 405 चेंडूत 56 चौकार आणि 2 सिक्ससह 341 धावा केल्या.
अजय रोहेराचा रेकॉर्ड ब्रेक
साकिबुलने त्रिशतक करत मध्य प्रदेशच्या अजय रोहेराचा (Ajay Rohera) रेकॉर्ड ब्रेक केला. याआधी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यूत सर्वाधिक धावांचा विक्रम हा अजय रोहेराच्या नावे होता. अजयने हैदाराबाद विरुद्ध 2018-19 च्या मोसमात ही खेळी केली होती. तेव्हा त्याने 267 धावा केल्या होत्या. मात्र आता त्रिशतक करत साकिबुलने अजयचा रेकॉर्ड ब्रेक केला.