IPL11 च्या ओपनिंंग सेरेमनीमध्ये 15 मिनिटं थिरकण्यासाठी रणवीर सिंंहला मिळणार 5 कोटी?
टी 20 क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणार्या आयपीएलचं यंदाचं 11वे पर्व रंगणार आहे.
मुंबई : टी 20 क्रिकेटचा महाकुंभ म्हणून ओळखल्या जाणार्या आयपीएलचं यंदाचं 11वे पर्व रंगणार आहे. आयपीएलच्या 11 व्या पर्वाची सुरूवात 7 एप्रिलपासून सुरू होणार आहे. यंदाच्या पर्वामध्ये पहिला सामाना मुंबईत वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई विरूध चैन्नई असा रंगणार आहे. पण आयपीएलचं रणशिंग फुंकण्यापूर्वी या कार्यक्रमाच्या ओपनिंग सेरेमनीला बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडचे सितारेही हजेरी लावणार आहेत.
रणवीर सिंह थिरकणार
यंदा 'पद्मावत'नंतर सर्वाधिक चर्चेत आलेला बॉलिवूड कलाकार म्हणजे रणवीर सिंह. रणवीर त्याच्या तुफान एनर्जीसाठी, विचित्र ड्रेसिंग स्टाईलसाठी, हटके ह्युमरसाठी ओळखला जातो. त्यामुळे यंदा आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीसाठी त्याची हजेरी खास आकर्षण ठरणार आहे.
15 मिनिटांसाठी 5 कोटी मोजणार?
टी-20 लीगचे चेअरमन राजीव शुक्ला आयपीएलच्या ओपानिंग सेरेमनीसाठी बॉलिवूडप्रमाणेच अमेरिकेसह जगभरातील अनेक कलाकारांच्या परफॉर्मन्ससाठी प्रयत्नशील आहेत. यामध्ये बॉलिवूडमधून रणवीर सिंहचं नाव चर्चेत आहे. 15 मिनिटं स्टेजवर थिरकण्यासाठी रणवीरला 5 कोटी मानधन मिळणार असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. रणवीरची फॅन फॉलोविंग आबालवृद्धांमध्ये आहे.
रणवीर सिंगचे अनेक बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट
रणवीर सिंह जोया अख्तरच्या 'गली बॉय', कबीर खानच्या '83', रोहित शेट्टीच्या 'सिम्बा'मध्ये झळकणार आहे. या चित्रपटांसोबतच रणवीर आणि दीपिका पादुकोण यंदा लग्नबंधनात अडकण्याची शक्यता असल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे.