कपिलवर सिनेमा, १९८३ विश्वचषकाच्या आठवणी रूपेरी पडद्यावर
१९८३ विश्वचषकाच्या आठवणी आता रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देवच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहे.
मुंबई : १९८३ विश्वचषकाच्या आठवणी आता रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देवच्या भूमिकेत रणवीर सिंग दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार एम.एस.धोनीच्या जीवनावर आधारित 'धोनी द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली.. आता भारताने १९८३ साली जिंकलेल्या पहिल्या विश्वचषकावर आधारित सिनेमा बनवण्यात येणार आहे.
सिनेमात रणवीर सिंग भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे. यापूर्वी कपिल देव यांची भूमिका अर्जुन कपूर साकारणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र आता रणवीरच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
१९८३ मध्ये भारताला मिळालेल्या अनपेक्षित विश्वचषक विजेतेपदाभोवती या चित्रपटाची कथा फिरते. कबीर खान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. सेलिब्रेटी क्रिकेट लीगचे व्यवस्थापकीय संचालक विष्णू वर्धन इंदूरी आणि फॅन्टम फिल्म्स या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.