IPL 2023 पूर्वी नीता अंबानींची मोठी खेळी; Rashid Khan कडे सोपवलं मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद
अफगानिस्तानचा स्पिनर गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) ला पुढील वर्षात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका लीग (SA 20 League) मध्ये मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
SA 20 League : आयपीएलच्या (IPL) धर्तीवर पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेत टी-20 लीगला (SA 20 League) सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये अधिकतर आयपीएलच्या फ्रेंचायजींने खरेदी केलेल्या टीम्स आहेत. मुंबई इंडियन्सशी (Mumbai Indians) संबंध ठेवणारी एमआय केपटाउनशी (MI Cape twon) संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. अफगाफिस्तानचा स्पिनर गोलंदाज राशिद खानला (Rashid Khan) एमआय केपटाउनचा कर्णधार बनवण्यात आलंय.
Rashid Khan ला मिळाली एमआय केपटाउनची कमान
अफगानिस्तानचा स्पिनर गोलंदाज राशिद खान (Rashid Khan) ला पुढील वर्षात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका लीग (SA 20 League) मध्ये मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सशी संबंध ठेवणारी एमआय केपटाउनचा कर्णधार म्हणून घोषित केलं आहे. तर दुसरीकडे वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डला एमआय एमिरेट्स (MI Emirates) चं कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे.
अशा परिस्थितीत हे दोन्ही खेळाडू आगामी सिझनसाछी मुंबई इंडियन्ससाठी लकी चार्म ठरू शकतात. या दोन्ही खेळाडूंनी जगाभरातील अनेक लीगमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे त्यांचा हा अनुभव एमआय केपटाऊनला पहिल्यांना ट्रॉफी जिंकवून देण्यात मदत करू शकतो.
एकूण 6 टीम्स यामध्ये होतील सहभागी
या लीगमध्ये असलेल्या 6 टीम्सना आयपीएल टीमच्या मालकांनी खरेदी केलं आहे. ज्यामुळे मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, सनराइजर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स सारख्या आयपीएच्या 6 फ्रेंचायझींकडे मालकी हक्क आहे.
10 जानेवारी 2023 पासून या लीगला सुरुवात होणार आहे. यामध्ये पहिला सामना मुंबई इंडियंस केप टाउन आणि पार्ल रॉयल्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. या लीगमध्ये एकूण 33 सामने खेळवले जाणार आहेत. तर फायनल सामना 11 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे.