IPLच्या फायनल लढतीत गुजरातसोबत `हा` संघ खेळणार, भारताच्या माजी क्रिकेटपटूचे भाकीत
भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने अंतिम सामन्याबाबत मोठे विधान केले आहे.
मुंबई : आयपीएल आता अंतिम टप्प्यात पोहोचलीय. फायनल सामना आता अवघ्या काही दिवसांवर आला आहे. कालच्या सामन्यातून आलेल्या अनपेक्षित निकालानंतर आता फायनलमध्ये गुजरात सोबत कोणता संघ खेळणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.त्यात आता एका माजी क्रिकेटपटूने अंतिम सामन्याबाबत मोठे विधान केले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात शुक्रवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर 2 सामना रंगणार आहे. या सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. कारण हे दोन्ही संघ फायनलमध्ये गुजरातशी सामना करून टॉफीवर नाव कोरण्याच्या हिशेबाने मैदानात उतरणार असल्याचे मत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले आहे.
'आरसीबीला 14 वर्षे झाली आहेत, मात्र अद्यापही त्यांनी ट्रॉफीवर नाव कोरले नाही आहे, तर 13 वर्षांपूर्वी राजस्थानने शेवटचे विजेतेपद जिंकले होते. त्यामुळे दोन्ही संघामध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. ही स्पर्धा खूप मोठी होणार आहे, कारण दोन्ही संघाना फायनलमध्ये दाखल व्हायचे आहे, असेही मत रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सवरील क्रिकेट लाईव्ह शोमध्ये बोलताना म्हटले.
दरम्यान आयपीएल 2022 मध्ये, बंगळुरू आणि राजस्थान या दोन्ही संघांनी स्पर्धेत चांगली कामगिरी केली असून ते विजेतेपदाचा दुष्काळ संपवू शकतात. बंगळुरूला अद्याप पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकता आली नाही, त्यामुळे बंगळुरू हा दुष्काळ संपवते का हे पहावे लागेल. तसेच राजस्थानने 2008 मध्ये आयपीएलचा पहिला सीझन जिंकला होता. त्यानंतर ट्रॉफी जिंकण्यात अपयशीच ठरला आहे. त्यामुळे यावर्षी ट्रॉफीवर नाव कोरण्यास राजस्थान सज्ज झाला आहे.