नवी दिल्ली : टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या वार्षिक मानधनाबाबत आता चर्चा सुरु झालीये. रिपोर्टनुसार, शास्त्री यांना प्रशिक्षकपदासाठी वार्षिक ७ ते साडेसात कोटी रुपये मानधन मिळू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय शास्त्री यांना ७ कोटीहून अधिक रुपये मानधनाचा प्रस्ताव देईल. याआधी अनिल कुंबळेसमोरही प्रेझेंटेशनदरम्यान इतक्याच मानधनाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. 


याआधी जेव्हा शास्त्री टीम इंडियाचे संचालक होते तेव्हा त्यांना ७ ते साडेसात रुपयांचे मानधन दिेले जात होते. दरम्यान, शास्त्रींसह काम करणारे सपोर्टिंग स्टाफ(बॉलिंग, बॅटिंग आणि फिल्डिंग कोच) यांना दोन कोटीहून अधिक मानधन दिले जाणार नाही. बोर्ड लवकरच याबाबतचे कॉन्ट्रॅक्ट फायनल करेल.