मुंबई: टीम इंडियाचे माजी कोच रवी शास्त्री कायमच वेगवेगळ्या विषयांमुळे चर्चेत राहिले. कधी टीमची चांगली कामगिरी तर कधी खराब फॉर्म या पलिकडे जात अगदी अफेअर, गर्लफ्रेंड ते आवडत्या अभिनेत्रीवरही चर्चा झाली. रवी शास्त्री नेहमीच आपलं मत लोकांपुढे ठामपणे मांडत असतात. त्यामुळे अनेकदा ते वादातही सापडले आहेत. रवी शास्त्रींच्या या स्वभावामुळे अनेकवेळा त्यांना अडचणींचा सामनाही करावा लागला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवी शास्त्री यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये रवी शास्त्री यांनी अगदी अफेअरपासून ते लग्नापर्यंतच्या सगळ्या प्रश्नांची बिनधास्त उत्तरं दिली आहेत. याशिवाय त्यांनी आवडती अभिनेत्री कोण हे देखील सांगितलं आहे. त्यांनी एक मुलाखती दरम्यान अमृता सिंह बद्दल देखील बिनधास्तपणे सांगितलं आहे. 


सुरुवातीच्या काळात रवी शास्त्री खूप जास्त प्रसिद्ध होते. त्यामुळे अनेक मुली त्यांच्या मागे होत्या. तरुणींमध्ये तर त्यांची चर्चा असायची. रवी शास्त्री जेव्हा अमृता राव यांना डेट करायचे तेव्हाही त्याची चर्चा व्हायची. रवी शास्त्री यांनी अमृता सिंह यांच्यासोबतची पहिली भेट कशी झाली हे देखील सांगितलं आहे. 


या व्यक्तीकडून टीम इंडियातील खेळाडूंना SEX करण्याचा सल्ला, वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ


रवी शास्त्री म्हणाले की, मी मुलींशी जास्त बोलायचो नाही. मात्र माझी आणि अमृताची अशी पहिली भेट होते ज्यामध्ये पहिली 10 मिनिटं मी ऐकत होतो आणि ती फक्त बोलत होती. यावर मुलाखत घेणाऱ्याने विचारलं की लग्नानंतरही असंच राहिलं तर? त्यावर मिश्कीलपणे उत्तर देत तोपर्यंत मी बॉस असेन असं रवी शास्त्री म्हणाले.


रवी शास्त्री यांची आवडती अभिनेत्री स्मिता पाटील असल्याचं सांगितलं. इतकच नाही तर स्मिता पाटील यांचे चित्रपट अमृता सिंह यांना पाहायला आवडायचे नाहीत असा खुलासा देखील रवी शास्त्री यांनी या व्हिडीओमध्ये केला. अमृता यांचा एक व्हिडीओ रवी शास्त्रींनी पाहिला. त्यामध्ये अमृता बॉक्सिंग करत होती. अनिल कपूर यांच्यासोबतचा हा सीन पाहून मला धडकी भरली असंही रवी शास्त्री म्हणाले. 


अनिल कपूर यांची अवस्था अशी करू शकते तर माझं काय होईल या विचारानेच अंगावर काटा आला आणि मी टीव्ही बंद केला असं यावेळी रवी शास्त्री म्हणाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. रवी शास्त्री यांचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. 


T20 पाठोपाठ कसोटीचं कर्णधारपदही नाही, विराट ऐवजी या खेळाडूकडे धुरा?