रवि शास्त्रींनाही माहिती नव्हते विराट-अनुष्काच्या लग्नाबद्दल...
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाबाबत काही ठरविक लोकांना माहिती होते. ते लग्न करणार यांची खबर टीम इंडियाचे कोच रवि शास्त्री यांना देखील नव्हती. एका मुलाखतीत रवि शास्त्री यांनी याचा खुलासा केला.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाबाबत काही ठरविक लोकांना माहिती होते. ते लग्न करणार यांची खबर टीम इंडियाचे कोच रवि शास्त्री यांना देखील नव्हती. एका मुलाखतीत रवि शास्त्री यांनी याचा खुलासा केला.
टीम इंडियाचे हेड कोच रवि शास्त्री यांना विचारले असता, तुम्हांला विराट-अनुष्काच्या लग्नाबद्दल पहिल्यापासून माहीत होते का, त्यावर रवि शास्त्री म्हटले, त्यांना या लग्नाबद्दल १० दिवसांपूर्वी कळले. टीव्ही १८ ला दिलेल्या मुलाखती त्यांनी हा खुलासा केला. त्यांना मी एसएमएसच्या माध्यमातून लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. जेव्हा तो भेटेल तेव्हा त्याला प्रत्यक्षात शुभेच्छा देणार आहे.
रवि शास्त्री यांना विचारले की लग्नानंतर विराटशी काही बातचित झाली का? त्यावर शास्त्री म्हणाले आमची कोणतीही बातचित झाली नाही. त्यांनी सांगितले की, आम्ही एकमेकांना मेसेज केले. मी विराट अनुष्कासाठी खूश आहे.