युवराज-धोनीच्या २०१९ वर्ल्डकपमधील सहभागाबाबत शास्त्रींनी केलेय मोठे विधान
२०१९च्या वर्ल्डकपमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांच्या सहभागाबात नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विधान केलेय.
नवी दिल्ली : २०१९च्या वर्ल्डकपमध्ये भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांच्या सहभागाबात नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विधान केलेय.
२०१९मधील वर्ल्डकपमध्ये धोनी आणि युवराज यांचा समावेश केला जाणार की नाही याबाबत अद्याप कोणताही विचार करण्यात आलेला नाही. २०१९चा वर्ल्डकप
अजून दूर आहे. धोनी आणि युवराज दोन्ही चॅम्पियन क्रिकेटर्स आहेत. वेळेनुसार काय करायचे ते ठरवता येईल. कर्णधाराशी बातचीत करुन पुढील योजना ठरवेन. याबाबत मी विराटशी चर्चा केलेली नाहीये, असे शास्त्री म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच अनिल कुंबळेने राजीनामा दिल्यानंतर रवी शास्त्री यांनी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आलीये. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, मी कोणताही भार घेऊन चालणार नाहीये. आधी जे काही झालं ती माझी समस्या नाहीये. नवी सुरुवात मी करणार आहे. मी जे काही विराटशी चर्चा करेन ती आमच्यात राहील.