Ravichandran Ashwin Test career : इंग्लडविरूद्ध झालेल्या 5 टेस्ट मॅचेसच्या सिरीजमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या टेस्ट मॅचमध्ये अश्विनने नुकताच आपल्या टेस्ट करिअरची 100 वी टेस्ट मॅच खेळलेली आहे. धर्मशाळा येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट कसोटीचा शेवटचा सामना खेळला गेला होता. या सामन्यात अश्विनने उत्कृष्ट कामगिरी करत इंग्लंडच्या फलंदाजांना धाराशाही केलं आणि इंग्लंडचे एकूण 9 फलंदाज तंबूत परत पाठवले. पण या पद्धतीच्या कामगिरी करूनसूद्धा अश्विन स्वतःच्या कामाबद्दल नाखूश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अश्विनने सोशल मीडियावर म्हटले आहे की, इतक्या वर्षांनंतरही माझ्या खेळात कोणतीच सुधारणा झाली नाहीये. खरं तर अश्विनच्याबरोबर असा एक अपवाद घडला, जो नेहमी पाहायला मिळत नाही. अश्विनने त्याच्या 100 व्या कसोटी सामन्यात 9/128 हा विक्रमी गोलंदाजीचा आकडा मिळवला आहे. अगदी असाच 9/128 चा गोलंदाजी आकडा अश्विनने त्याच्या पदार्पण कसोटी सामन्यातही मिळवला होता, जी त्याने दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली होती.


अश्विनच्या या कमालीच्या कामगिरीवर एका सोशल मीडिया यूजरने त्याला टॅग करून पोस्ट केली आहे, ज्यात त्याच्या पदार्पण आणि 100 व्या कसोटीच्या गोलंदाजीचे आकडे दिलेय. अश्विनने विनोदी शैलीत याला प्रतिसाद देत म्हटले आहे की, "इतक्या वर्षांनंतरही कोणतीही सुधारणा झाली नाही." नंतर दुसऱ्या ओळीत त्याने लिहिलं की, "फक्त माझी आईच असं म्हणू शकते." त्यानंतर त्याने हसण्याचा आणि हृदयाचा इमोजी लावलाय. म्हणजेच त्याने पहिल्या आणि 100 व्या कसोटीत तितकीच चांगली कामगिरी केली होती.      


 


इंग्लंडविरूद्धच्या कसोटीत पूर्ण केला 500 कसोटी विकेट्सचा विक्रम 


 


इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत अश्विनने 500 कसोटी बळी घेण्याचा विक्रम गाठला आहे. यासोबतच त्याने इंग्लंडविरुद्ध 100 कसोटी बळी घेण्याचाही विक्रम केला होता. या पाच सामन्यांच्या मालिकेत अश्विन सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरलेला आहे. त्याने 24.81 च्या सरासरीने 26 बळी घेतले होते. इंग्लंडविरुद्ध नूकताच झालेल्या टेस्ट कसोटीत अश्विनने दोन वेळेस पाच विकेट्स घेण्याचीही कामगिरी केली आहे. रविचंद्रन अश्विन आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे तर साऱ्या क्रिकेटफॅन्सचे लक्ष अश्विनवर असणार, कारण अश्विन नुकताच टेस्ट क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणार आहे.