Ravichandran Ashwin mankading : आयपीएलच्या 16 (IPL 2023) व्या सिझनला सुरुवात झाली आहे. आज आयपीएलचा आठवा सामना पंजाब किंग्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals vs Punjab Kings) यांच्यामध्ये खेळवला जातोय. दरम्यान राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) पुन्हा एकगा मंकडींगच्या मुद्द्यावरून चर्चेत आलाय. आजच्या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) विरूद्ध मंकडिंग करण्याच्या प्रयत्नात असलेला अश्विन कॅमेरात कैद झाला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.


मंकडिंगमुळे अश्विन पुन्हा एकदा चर्चेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज रविचंद्रन अश्विन शिखर धवनला मंकडिंग पद्धतीने आऊट करताना दिसला. पंजाब किंग्स गोलंदाजी करत असताना सहाव्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. यावेळी नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या शिखर धवनला त्याने मंकडिंग आऊट करण्याची हूल दिली. मात्र प्रत्यक्षात त्याने रनआऊट केलं नाही.


नेमकं काय झालं?


पंजाब फलंदाजी करत असताना सहावी ओव्हर टाकण्यासाठी अश्विन आला होता. सहाव्या ओव्हरचा तिसरा बॉल तो टाकणार इतक्यात नॉन-स्ट्रायकर एंडला उभा असलेला शिखर क्रिझपासून काहीसा थोडा पुढे गेलेला त्याने पाहिलं. ही बाब लक्षात येताच त्याने बॉल टाकला नाही. यावेळी त्याने शिखर धवनला केवळ इशारा देऊन सोडून दिलं.


जॉस बटलरला केलं होतं आऊट


2019 च्या आयपीएलमध्ये पंजाबच्या टीममध्ये असताना अश्विनने राजस्थानच्या टीममध्ये खेळत असलेल्या जॉस बटलरला अशा पद्धतीने रनआऊट केलं होतं. तेव्हापासून मंकडिंग आणि अश्विन हा चर्चेचा विषय ठरतो. त्यावेळी या विकेटवरून मोठा वादंग माजला होता. अखेर याबाबत एक नियम काढण्यात आला. 



दोन्ही टीम्सची प्लेईंग 11


पंजाब किंग्स 


शिखर धवन (कर्णधार), प्रभसिमरन सिंह, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), शाहरुख खान, सैम कुरेन, सिकंदर रजा, नाथन एलिस, हरप्रीत बरार, राहुल चहर, अर्शदीप सिंह


राजस्थान रॉयल्स 


यशस्वी जयस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल