चेन्नई : भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनचे आजोबा एस नारायणसामी यांच्या वृद्धापकाळाने निधन झालेय. कुटुंबातील सूत्रांनी ही माहिती दिलीये. ते ९२ वर्षांचे होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी त्यांचे निधन झालेय. संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अश्विनचे आजोबा नारायणसामी हे क्रिकेटप्रेमी होते. अश्विन एक क्रिकेटपटू म्हणून घडत असताना सुरुवातीच्या काळात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 


अश्विन सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडमध्ये आहे. दुखापतीमुळे तो आयपीएलच्या दहाव्या हंगामात खेळू शकला नव्हता. मात्र काल न्यूझीलंडविरुद्धच्या वॉर्मअप सामन्यातून त्याने दमदार पुनरागमन केलेय. अश्विनने या सामन्यात ६ षटकांत ३२ धावा देताना एक विकेट मिळवली होती.