लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा ९ विकेट राखून पराभव केला आहे. रोहित शर्माचं शतक आणि विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे भारतानं २६५ रन्सचं आव्हान अगदी सहज पार केलं. या मॅचमध्ये जडेजानं नवीन रेकॉर्ड बनवलं आहे. रवींद्र जडेजा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जडेजाच्या आधी हे रेकॉर्ड झहीर खानच्या नावावर होता. झहीरनं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ९ मॅचमध्ये १५ विकेट घेतल्या होत्या. जडेजानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ९ मॅचमध्ये १६ विकेट घेतल्या आहेत. जडेजानं ३५ व्या ओव्हरमध्ये जडेजानं शाकिब अल हसनची विकेट घेतली. जडेजानं त्याच्या १० ओव्हरमध्ये ४८ रन्स देऊन १ विकेट घेतली.


जडेजा आणि झहीरनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हरभजन सिंग (१४), सचिन तेंडुलकर(१४), इशांत शर्मा(१३) आणि भुवनेश्वर कुमार(९) विकेट घेतल्या आहेत. २८ वर्षांच्या जडेजानं या मॅचआधी १३२ वनडेमध्ये १५४ विकेट घेतल्या आहेत.